जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात महसूल कर्मचाऱ्यांचा उठाव
------------------------
महसूल कर्मचारी व मंडळाधिकारी निलंबन मागे घेण्याची मागणी
-------------------
राजेंद्र जैन /कडा
------------------------
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या एकतर्फी अन्यायकारक निर्णयाविरोधात आष्टीमध्ये महसूल कर्मचारी, तलाठी, मंडळाधिकारी संघटनांनी एकत्रित येऊन एक मंडळाधिकारी व दोन महसूल कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे. या मागणीसाठी आष्टीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.
याबाबत आष्टी येथील महसूल कर्मचारी, तलाठी, मंडळाधिकारी संघटनांनी एकत्रित येऊन तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र नागरीसेवा नियमानुसार एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यापूर्वी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारणे दाखवा नोटीस देणे बंधनकारक असतानाही एक मंडळाधिकारी, दोन महसूल कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याने सदर निलंबन हे अन्यायकारक असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.
याबाबत महसूल कर्मचाऱ्यांकडून प्रसिद्ध देण्यात आलेल्या निवेदनावर मंडळाधिकारी गजेंद्र राठोड, एस एम गोलांडे, राजू चव्हाण, दादा गवळी, जोंडकर नवनाथ, राऊत जगन्नाथ, संजय केमधरणे, अकोलकर, जाधव अंकिता, मोहन पाचंगे, दिलीप कनेरकर, भगत प्रणील, यांच्यासह अनिल ठाकरे, योगेश गोरे, गौतम ससाणे, अनारसे न्यानदेव,अशोक सुरवसेसह महसूल कर्मचारी संघटनेचे भगीरथ धारक, दीपक गालफाडे, सोनटक्के, श्रीमती वीर, अशोक धोंडे, मीरा नजन, बांगर व इतर कर्मचाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.
--------------%%-----
कर्मचाऱ्यात समन्वयाचा अभाव..?
------------------
जिल्ह्यातील महसूल विभागातील निलंबित कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे. याकरिता आष्टी येथील महसूल कर्मचारी संघटना व तलाठी मंडळाधिकारी संघटना यांच्याकडून तहसीलदारांना वेगवेगळे निवेदने देण्यात आली. त्यामुळे एकाच विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव पहिल्यांदाच दिसून आल्याने हा विषय आष्टीत नाहक चर्चेचा विषय ठरला आहे.
--------%%-------


stay connected