*राजमाता आश्रम शाळेतील प्राध्यापक देवकर सरांचे कौतुकास्पद यश*
कासम शेख दौलावडगाव
आष्टी तालुक्यातील मराठवाडी राजमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील प्राध्यापक बाबासाहेब देवकर सर यांनी राज्यस्तरीय सेट परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून शाळेचा लौकिक वाढवला आहे.देवकर सरांचे हे यश शाळेसाठी अभिमानास्पद असून इतर शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.” त्यांच्या शैक्षणिक निष्ठा, परिश्रम व सातत्यपूर्ण जिद्दीचे कौतुक करत भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देऊन संस्थेचे संचालक श्री अमोल राजे तरटे सर,प्राचार्य श्री. दानवे सर, सहकारी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.यामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
stay connected