अंभोऱ्याचा दे- दणका पाहून, आष्टीच्या पोलिसांना कर्तव्य आठवले ?
----------------------
रुईनालकोलमध्ये जुगारीवर छापा;रोख 2900/-₹ पकडले
--------------------
राजेंद्र जैन / कडा
-------------------
तालुक्यातील रुईनालकोल येथील शेतात पैसे लावून जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर आष्टी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी छापा मारून सहा आरोपीकडून फक्त अन फक्त रोख 2900/- रक्कम व काही दुचाकी, असा एकूण 3 लाख 45 हजाराचा ऐवज जप्त करून जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली. सदर कारवाई म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढल्याची चर्चा नागरिकात होऊ लागली आहे.
आष्टी तालुक्यातील रुई नालकोल या गावातील एका शेतामध्ये सोमवार दि. 1 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास जुगारीचा अड्डा चालू असल्याची खबर आष्टी पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा मारून पैशावर जुगार खेळणाऱ्या सहा आरोपींकडून केवळ रोख 2900/- रक्कम व काही दुचाकी, असा एकूण 3 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. पकडलेल्या मोबाईलचं काय झालं हे पोलिसांनाच माहीत असावं, कडा पोलीस चौकीचा अंमल असलेले पोलीस अंमलदार मजरुद्दीन सय्यद यांच्या फिर्यादीवरून जगन्नाथ बाबुराव भिसे, अजय राजेंद्र नालकोल, मसू धोत्रे, उमेश रमेश खांडेकर, गोरख उत्तम नालकोल, सागर शिवाजी नालकोल, (सर्व रा. रुईनालकोल ता. आष्टी ) पैसे लावून जुगार खेळणाऱ्या या आरोपींवर आष्टी पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर इतर काही जुगारी पळून गेल्याचे पोलीस सांगतात. पुढील तपास पोलीस हवालदार भाऊसाहेब आहेर करीत आहेत. अंभोरा पोलिसांच्या जुगार अड्ड्यावरील एका पाठोपाठ एक अशा दे- दणका कारवाया पाहून आष्टी पोलिसांना आपले कर्तव्य आठवले, म्हणावे लागेल. रुईनालकोल येथील पोलिसांची कारवाई म्हणजे अक्षरश: डोंगर पोखरून उंदीर पकडल्याची चर्चा नागरिकात होऊ लागली आहे.
---------%%-----
पोलीस तर म्हणतात, धंदे बंद..?
आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी मलाईदार अवैद्यांनी बाजार थाटला असला तरी आष्टी, कडा पोलीस मात्र अंभोऱ्याच्या बातम्या वाचून दात काढीत आहेत. कडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास पंधरा ठिकाणी जुगारीचे अड्डे चालू आहेत. गणेशोत्सवात अनेक हॉटेल, ढाब्यावर अवैध दारूची बिनबोभाट विक्री चालू आहे. दररोज लाखो रुपयाची उलाढाल होत आहे. याची मलिदा गोळा करणाऱ्या लक्ष्मी भक्तांना आणि साहेबांना सगळं माहिती असूनही पोलीस अर्थपूर्ण दक्ष दुर्लक्ष करीत आहेत.
-------%%------
stay connected