बाजार समितीचे वरिष्ठ लिपिक शेख शाकीरभाई यांचे निधन
------------------------
राजेंद्र जैन / कडा
------------------
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्तव्याशी प्रामाणिक असलेले वरिष्ठ लिपिक शेख शाकीरभाई कचरू यांचे गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय- 44 होते.
आष्टी तालुक्यातील केरूळ येथील रहिवासी तथा कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले शाकीरभाई एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून तालुक्यात परिचित होते. दिवंगत शेख यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. शेख यांच्या अचानक निधनाने कडा कृषी उत्पन्न बाजार समितीने एक शांत- संयमी अनुभवी आणि कर्तव्याशी प्रामाणिक असणारा चांगला कर्मचारी गमावल्याची भावना बाजार समितीचे सचिव हनुमंत गळगटेंसह व्यापारी संघटनेकडून व्यक्त होत आहे.
-------%%----
stay connected