वातावरणात बदल : सर्दी, खोकल्याने रुग्ण त्रस्त
-------------------------
पावसाळ्यात लहान मुले व वृद्धांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
---------------------
राजेंद्र जैन / कडा
--------------------
सध्या सकाळी गार, दुपारी गरम आणि ढगाळ यासारखे आरोग्यास हानिकारक रोगाट वातावरण निर्माण झाले असून, त्यात डासांच्या प्रादुर्भावाची भर पडली. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला यासारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढल्यामुळे दवाखान्यात रुग्णांची गर्दी दिसत आहे. पावसाळ्याच्या दिवसात लहान मुले व वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. असे वैद्यकीय तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
पावसाळ्यातील बदलत्या हवामानामुळे डेंगू, मलेरिया, गॅस्ट्रो, व्हायरल फिवर, टायफाईड यासारख्या साथीच्या आजारांचे प्रमाण अधिक असते. सध्या सकाळी गार आणि दुपारी गरम आणि संध्याकाळी ढगाळ अशा या रोगाट वातावरणामुळे सर्दी खोकल्याच्या आजाराने त्रस्त रुग्ण वाढले आहेत. सध्या विषम वातावरण वेगवेगळ्या विषाणूंसाठी पोषक असल्याने ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येतात. तसेच साचलेले कचऱ्याचे ढिगारे, सांडपाण्याची डबकी तसेच घराच्या परिसरात वाढलेल्या गवतामुळे डासांची उत्पत्तीतून साथीचे विविध आजार डोके वर काढतात, पावसाळ्यात विषाणूजन्य संसर्गाची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप किंवा इतर लक्षणे आढळल्यास नागरिकांनी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे तज्ञ सांगतात.
--------%%---------
पावसाळ्यात घ्यावयाची काळजी
-----------------------
साथजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी उघड्यावरील खाद्यपदार्थ, शिळे अन्न खाणे टाळावे. उकळलेले स्वच्छ पाणी प्यावे, घराभोवती गवत किंवा पाणी साचू देऊ नये, तसेच सर्दी, खोकला, हलकासा ताप, अंगदुखी, कणकण आल्यास दुर्लक्ष करू नये. घरात इतरांना संसर्गाची लागण होऊ नये, म्हणून तोंडाला मास्क वापरावे किंवा अलिप्त रहावे. घरगुती उपचार करण्याऐवजी तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.
-डॉ. संदीप टेकाडे कडा
------%%-----
stay connected