लोणी सय्यदमीर येथील मुख्य रस्त्याची लागली वाट ! रस्ता दुरुस्तीचे काम सुरु न झाल्यास ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

 लोणी सय्यदमीर येथील मुख्य रस्त्याची लागली वाट ! रस्ता दुरुस्तीचे काम सुरु न झाल्यास ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा







लोणी ( प्रतिनिधी ) - आष्टी तालुक्यातील नगर - बीड जिल्हयाच्या सिमेवरील लोणी सय्यदमीर येथील मुख्य रस्त्याची पूर्णतः वाट लागली असुन प्रवाशांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे ! या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरु न झाल्यास उपोषणाचा इशारा जिल्हाधीकारी बीड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .


Tej


गेल्या अनेक वर्षांपासून लोणी सय्यदमीर गावचे सर्व रस्ते अतिशय खराब झालेले आहेत. जिल्हाधिकारी बीड यांना यापुर्वी जुन २०२५ च्या पहिल्या आठवड्यामध्ये रस्ते दुरुस्ती करण्याबाबत ग्रामपंचायतने पत्र दिले होते. रस्ते दुरुस्त झाले नाहीतर लोणीची एस.टी. बंद होईल याबाबत  कळविले होते. आता आमची एस.टी बंद होणार म्हणुन एस.टी. चे पत्र आले आहे. एस.टी. बंद झाल्याने आमच्या विद्यार्थांच्या शैक्षणिक नुकसानिस आपण जबाबदार रहाल. तसेच आजारी नागरीकांना दवाखाण्यात जाता येत नसल्याने त्याच्या जीवीतास काही बरे वाईट झाल्यास आपण जबाबदार असाल. तसेच  दोन दिवसात रस्त्याचे काम सुरु झाले नाहीतर लोणी येथील महीला, पुरुष, जेष्ठ नागरीक उपोषणाला बसणार असल्याचा इशारा, सरपंच सौ. शारदा संजय रकटाटे यांनी आज जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.