शरद जोशींची जयंती आज दिल्लीत साजरी करणार

 शरद जोशींची जयंती आज दिल्लीत साजरी करणार 




कडा (प्रतिनिधी) शेतकरी असंतोषाचे जनक मा.शरद जोशी जी यांच्या ९० व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन आज बुधवार दि.३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या वेळेत संपन्न होणार आहे.स्पीकर हाँल कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया, रफी मार्ग, नवी दिल्ली येथे शेतकरी मेळावा घेत साजरा करण्यात येणार आहे. शरद जोशी यांनी महाराष्ट्रातील व देशातील शेतकऱ्यांपर्यंत अर्थवाद चळवळीतून सरकार आपल्याला कसे लुटत आहे.याबद्दल शेवटच्या क्षणापर्यंत मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितलेल्या कर कर्जा नहीं देगे,बिजली का बिल भी नहीं देगे या घोषणेचा फायदा सर्व शेतकऱ्यांना झाला. आज सरकारी धोरणामुळे महाराष्ट्रात व देशात दररोज दहा ते बारा शेतकरी आत्महत्या होत आहेत.शरद जोशी यांनी शेती संदर्भातील धोरणातील तरतुदी जसे की शेती मालावरील निर्यात बंदी उठवावी.खुल्या अर्थव्यवस्थेचा लाभ शेती क्षेत्राला दिला असता तर भारत सरकारचे चलन आज एक रूपया बरोबर एक डाँलर झाले असते. भारतीय किसान-सांघ परिसंघ (सिफा) व शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे प्रमुख मार्गदर्शक मा. रघुनाथ दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा जयंतीचा कार्यक्रम होत आहे.या शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांसंदर्भात सर्व विषयावर चर्चा होऊन ठराव भारत सरकार यांना देण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी देशभरातील विविध राज्यातील शेतकरी नेते उपस्थित राहणार आहेत.तसेच महाराष्टातील हि शेतकऱ्यांनी या जयंतीच्या कार्यक्रमासाठी दिल्लीत उपस्थित रहावे.असे बीड जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बहूसंख्येने हजर राहण्याचे आव्हान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन, रामेश्वर गाडे, राधा किसन गडदे, रहेमान सय्यद, संतोष गुंड, रिजवान बेग,निलाराम टोळे,लखन हाके, मच्छिंद्र जगताप या पदाधिकार्यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.