श्रीम. किरण घाडगे- माने मॅडम सेट परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण

 श्रीम. किरण घाडगे- माने मॅडम सेट परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण



        सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांचे मार्फत १५ जून २०२५ रोजी  घेण्यात आलेल्या महाराष्ट्र व गोवा राज्यातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या (सेट) पात्रता परीक्षेत श्रीम. किरण घाडगे- माने मॅडम चांगले मार्क्स घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत.

 अकलूज येथील रहिवासी असलेल्या उच्चविद्याविभूषित श्रीम. किरण घाडगे या सध्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथून पीएच.डी पूर्ण करत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिवणे गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेले आहे. माध्यमिक शिक्षण शिवणे गावातील हायस्कूल मध्ये झालेले आहे. जुनियर कॉलेज सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे व डी एड संभाजीराव शिंदे अध्यापक विद्यालय सोलापूर येथे पूर्ण झाले आहे.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून  पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर त्यांचे बी.एड  इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ येथून झाले आहे. एम एडची पदवी त्यांनी एसएनडीटी  विद्यापीठ मुंबई येथून घेतली आहे. तसेच त्या गव्हर्मेंट डिप्लोमा को-ऑपरेशन अँड अकाउंटन्सी  ही परीक्षा सुद्धा चांगल्या मार्काने पास झाले आहेत. शालेय व्यवस्थापन पदविका हा कोर्सही त्यांनी पूर्ण केला आहे. सध्या त्या  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळापूर मुली येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. गेली 19 वर्षांपासून त्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपली सेवा बजावत आहेत. ज्ञानदानाच्या पवित्र  सेवेसोबतच त्यांनी  सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक क्षेत्रात सुद्धा आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. उघडेवाडी शाळेत असताना त्यांनी स्वतः सायकली शाळेत भेट देऊन सायकल बँक योजना सुरू केली व त्या माध्यमातून शाळेला भरपूर सायकली भेट मिळाल्या. गेल्या दहा वर्षापासून दरवर्षी  त्या आपल्या मुलांचे वाढदिवस जिल्हा परिषदेच्या शाळेत साजरे करत असून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना त्या शिक्षणामध्ये मदत करत आहेत. *ग्रामीण भागामध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रीमती किरण घाडगे नक्कीच आजच्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, तरुण पिढीसाठी मार्गदर्शक आहेत.*

        त्यांच्या या यशामध्ये त्यांचे आई -वडील, पती,मुले,घाडगे व माने परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक, सहकारी शिक्षक,गुरुवर्य, मैत्रिणी तसेच त्यांचे विद्यार्थी यांचा मोलाचा वाटा आहे असे त्या म्हणतात. *स्वतःचे प्रामाणिक कष्ट, थोरामोठ्यांचे शुभाशीर्वाद व प्रेरणा तसेच विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा यामुळेच आपल्याला हे यश मिळू शकले असे त्या म्हणाल्या.*

 त्यांच्या या उज्वल यशाबद्दल माळशिरस तालुक्याचे माजी गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख साहेब, गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी  मॅडम, विस्तार अधिकारी महादेवी गुंड मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळापूरचे मुख्याध्यापक, युन्नूस तांबोळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रणजित सरवदे व सर्व सदस्य तसेच सर्व शिक्षक, त्यांचे सहकारी शिक्षक मैत्रिणी तसेच त्यांचे सर्व आप्तेष्ट, स्नेहीजण यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.