आष्टी आणि शिरूर तालुक्यातील पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत.. आ.सुरेश धस यांच्या प्रशासनाला सूचना..

 आष्टी आणि शिरूर तालुक्यातील पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत..
आ.सुरेश धस यांच्या प्रशासनाला सूचना.. 

********************************




*******************************

आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी व शिरूर तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी आष्टी तहसिल कार्यालयात तातडीची बैठक घेऊन अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यासंबंधी महत्त्वपूर्ण सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत..



           गेल्या दोन-तीन दिवसापासून झालेल्या जोरदार पावसामुळे आष्टी व शिरूर (कासार) तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा तसेच उपाययोजना करण्याबाबत स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्यांना मदतीबाबत अस्वस्थ करून नद्यांना आलेल्या अचानक पुरामुळे अडकलेल्या लोकांना त्यातून बाहेर काढून दि.१६ रोजीच रात्री ७ वा.आष्टी तहसिल कार्यालयात प्रशासनाची बैठक घेतली..या बैठकीस उपविभागीय अधिकारी वसिमा शेख, तहसीलदार वैशाली पाटील, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते..

या बैठकीत आ.सुरेश धस म्हणाले, अनेक गावांत नदी नाल्याचे पाणी घरात शिरल्यामुळे घरांची पडझड झाली असून  नदीकाठच्या जमीनी खरडून गेल्या आहेत.. त्याबाबत तात्काळ पंचनामे करावेत..ज्या गावातील पूलावर पाणी जाऊन गावांचा संपर्क तुटला आहे तेथील नागरिकांना पुलावरून जाऊ नये,असे आवाहन करावे तसेच पुलांच्या तात्काळ दुरुस्तीबाबत प्रस्ताव सादर करावेत..

आष्टी तालुक्यांतील पाझर तलाव, साठवण तलाव,सिंचन तलाव, पूर्ण क्षमतेने भरून जात आहेत.काही तलाव फुटले आहेत तसेच काही तलावातील पाणी सांडवा फोडून काढून देण्यात आले आहेत.सदरील तलावांच्या दुरुस्तीचा,पडझड झालेल्या कोल्हापुरी बंधारे व सिमेंट नाला तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी जाऊन शाळेचे नुकसान झालेले आहे,अशा शाळांचे दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करावे व शाळेची इमारत धोकादायक असल्यास वर्ग इतरत्र भरवण्यात यावेत.गावा गावांना जोडणारे रस्ते पावसामुळे खचल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. त्या रस्ते दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करावा.अनेक गावांतील घरामध्ये पाणी जाऊन नागरिकांचे नुकसान झाले आहे अशा नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था करावी.पोल पडल्यामुळे व तार तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे अशा गावांमध्ये तात्काळ विद्युत पुरवठा चालू करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.

बंद असलेल्या बसेस चालू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी.नाल्या जेसीबीव्दारे खुल्या करून पाणी काढून देणे व नाल्या दुरुस्ती कराव्यात शहरातील गटारी तुंबल्यामुळे पाणी शहरातील मुख्य रस्त्यांवर आले आहे. या गटारी जेसीबीव्दारे खुल्या करण्यात याव्यात. अतिवृष्टीमुळे रोगराई (डेंगू मलेरिया) पसरण्याची भीती आहे.तरी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्यात सर्व विभागाच्या एकत्रित नुकसानीचा मदत मिळणेबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी  बीड यांनी शासनाकडे तत्काळ सादर करावा,अशी सूचना देखील आमदार सुरेश धस यांनी केली आहे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.