आष्टी तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ

 आष्टी तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ 



कडा (प्रतिनिधी) बाजीज क्रीडा मंडळ वाघळुज व श्री संत कैकाडी महाराज माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय वाघळुज यांच्या संयुक्त विद्यमाने आष्टी तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा सन २०२५-२६ च्या १७ वर्ष वयोगटातील मुले यांचा बक्षिस वितरण समारंभ कार्यक्रम दिनांक १३ सप्टेंबर २०२५ शनिवार रोजी सायंकाळी ५:३० साडेपाच वाजता श्री संत कैकाडी महाराज माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय वाघळुज ता.आष्टी या ठिकाणी आयोजक संतोष श्रीधर गुंड शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष यांनी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धैर्यशील हनुमंत थोरवे लोकमान्य शिक्षण संस्थाचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. हे बक्षिस वितरण युवा नेते जयदत्त (भैय्या) धस, युवा नेते यश (भैय्या) आजबे,युवा नेते अजय (दादा) धोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष ऋषिकेश दरेकर, तेजवार्ताचे संपादक बबलूभाई सय्यद,पत्रकार अनिरुद्ध धर्माधिकारी,आज मराठीचे संपादक अविशांत कुमकर,पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रहेमान सय्यद यांच्या हस्ते होणार आहे. तरी या बक्षिस वितरण समारंभाच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक संतोष श्रीधर गुंड यांनी केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.