पीक नुकसान भरपाईसाठी.." ई- पीक " पाहणीची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवावी..
ही मागणी अजितदादांनी बैठकीतच वाढवली..
बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापना त बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित दादा पवार यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये नुकत्याच झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पीक पाहणी ची मुदत वीस सप्टेंबर पर्यंतच होती परंतु ही बाब लक्षात घेऊन आमदार सुरेश धस यांनी लिपिक पाहणीची मदत दहा दिवस वाढवून 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात यावी अशी मागणी केली त्याबाबत अजित दादा पवार यांनी तात्काळ मान्य करून त्यासंबंधीच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मा. विवेकजी जॉन्सन साहेब, मा श्री. जितिनजी रहमान(मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. श्री. नवनीत कॉवत साहेब (पोलिस अधीक्षक),मा. बजरंग सोनवणे (लोकसभा सदस्य)सर्व विधानसभा, विधानपरिषद सदस्य, यांच्यासह अप्पर, निवासी, उपजिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या समवेत मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ते अतिवृष्टीवर ढगफुटी झाली आहे त्याबाबत.. " आपत्ती व्यवस्थापन व निवारण" यावर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
यावेळी आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये ढगफुटी व अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आष्टी व शिरूर कासार तालुक्यातील शेत जमिनी खरडून गेलेले आहेत... उभ्या पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे....नदीलगतच्या जलसिंचन विहिरी पूर्णपणे बुजलेल्या आहेत (दगडी बांधकाम/सिमेंट रिंग वाहून गेली) बोरवेलचे नुकसान होऊन सोलार विद्युत पंप वाहून जात मोठे नुकसान झाले आहे.
ग्रामीण मार्गावरील छोटे नळकांडी पूल, डांबरी रस्ते, वस्ती रस्ते... गाव तलाव,पाझर तलाव मोठ्या प्रमाणावर फुटून शेतकऱ्यांच्या शेताचे नुकसान झालेले आहे.
यामध्ये महावितरण विभागाचे विद्युत पोल व रोहित्र पुराच्या अतिउच्च दाबाच्या प्रवाहामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाहून गेलेले आहे.. आष्टी व शिरूर कासार या तालुक्यात जवळपास 600 ते 700 पोल, तारा व शेतकऱ्यांचे सोलार पंप वाहून गेलेले आहेत.
शेतकऱ्यांच्या कांदा चाळी जनावरांचे पशुखाद्य मुरघास बॅग, ओला व सुखा चारा पुरामध्ये वाहून गेलेले आहेत.काही ठिकाणी दुधाळ गाई, वासरे व शेळ्या पुरात वाहून गेल्या आहेत व पाण्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आहेत.त्यांना योग्य मदत व्हावी.
प्रामुख्याने कडा शहरांमध्ये छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी भरलेला किराणा माल व इतर साहित्य पुराणे व दुकानात पाणी गेल्याने व्यावसायिकांचं लाखो रुपयांचे नुकसान झालेलं आहे याबाबत नुकसान भरपाई मिळावी.
तसेच जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी बाजार ओठे, अंगणवाडी खोली इत्यादी मध्ये पाणी जाऊन व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.
जलसिंचन व लघु पाटबंधारे विभाग अंतर्गत मोठ्या प्रमाणावरती पाझर तलाव गाव तलाव सांडवे फुटून व भिंती फुटून शेत जमिनीचे नुकसान झाले आहे..आष्टी तालुक्यात सीना, मेहकरी, कांबळी, कडी कोल्हापुरी पद्धत बंधाऱ्याचे आऊट ब्लांकिंग (दोन्ही बाजूचे भराव) फुटल्याने नदीपात्रा लगतील शेत खरडून गेलेले आहे व मोठ्या प्रमाणावर शेताचे नुकसान झाल्याचे स्पष्ट आहे. याकरिता जलसंपदा विभागाच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या माध्यमातून तातडीने या बंधाऱ्यांच्या फुटलेल्या भिंती व भराव दुरुस्त करून वाहून जाणारे पाणी पुढील सिंचनाकरिता साठवणे आवश्यक आहे.याकरिता तातडीने निर्णय व्हावा.
यासह राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून खरडून गेलेल्या जमिनीकरिता मिळणारे अनुदान हेक्टरी 2.5 लक्ष होते.. परंतु मागील काही दिवसांपासून तेच अनुदान 45-50 हजाराच्या जवळपास दिले जाते तरी हे अनुदान आहे कमी आहे यामध्ये वाढ व्हावी.
आष्टी, शिरूर का. तालुक्यातील नदीपात्रालग शेतामध्ये आजही तीन ते चार फूट पाणी आहे त्यामुळे सद्यस्थितीमध्ये त्या ठिकाणी कृषी सहाय्यक,तलाठी व ग्रामसेवक यांनी पंचनामे (स्थळ पाणी करणे) गैरसोयीचे व अशक्य आहे.. त्यामुळे येणाऱ्या आठ दिवसांमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत प्रशासनास कळवावे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करीता ई-पीक पाहणी आवश्यक आहे..तरी ई-पीक पाहणी करण्यासाठी दिनांक 20 सप्टेंबर कालावधी दिलेला आहे तरी तो कालावधी दहा दिवस वाढवून 30 सप्टेंबर पर्यंत कालावधी वाढून देण्यात यावा जेणेकरून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता येईल व झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळेल याबाबत महत्त्वाच्या मुद्द्यांवरती मा. उपमुख्यमंत्री यांच्याकडे विनंती केली असता त्यांनी याबाबत तात्काळ मा. जिल्हाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी यांना सूचना केल्या आहेत.
stay connected