मिशन जरेवाडी शैक्षणिक वर्ष 2024-25 अंतर्गत सर्वोत्कृष्ट - शाळा म्हणून केंद्रीय प्राथमिक शाळा धानोरा, तालुका - आष्टी ची निवड

 

मिशन जरेवाडी शैक्षणिक वर्ष 2024-25 अंतर्गत सर्वोत्कृष्ट - शाळा म्हणून केंद्रीय प्राथमिक शाळा धानोरा, तालुका - आष्टी ची निवड



जिल्हा परिषद बीड शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बीड, वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन जरेवाडी शैक्षणिक वर्ष 2024-25 अंतर्गत सर्वोत्कृष्ट - शाळा म्हणून केंद्रीय प्राथमिक शाळा धानोरा, तालुका - आष्टी ची निवड

'मिशन जरेवाडी' उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये धानोरा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या उल्लेखनीय कार्यामुळे प्रकल्पाच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी शक्य झाली. तसेच शाळेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात सर्व शिक्षकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

या उपक्रमातील कार्यतत्परता, समर्पण आणि उत्कृष्ट कामगिरी कौतुकास्पद असून, ती इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. अशा आशयाचे सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते यावेळी देण्यात आले, यावेळी मुख्याध्यापक तरटे सर , केंद्रप्रमुख पठाण सर , गटशिक्षणाधिकारी सिमा टकले मॅडम आदी उपस्थित होते .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.