एसटीचे वाहतुक निरीक्षक बबन गायकवाड यांचा सेवापुर्ती सोहळा
-----------------
कडा/ वार्ताहर
----------------
कडा येथील राज्य परिवहन महामंडळाचे सहायक वाहतुक निरीक्षक बबन गायकवाड यांच्या नियतवयोमानानुसार रविवार दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळी येथील प्रविण मंगल कार्यालयात त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आष्टी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात सहायक वाहतूक निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले बबन गायकवाड यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुरेश धस असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर बाळासाहेब आजबे यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्राप सदस्य, मित्रपरिवार नातलग आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
-------%%-----
stay connected