गहूखेल म्हसोबावाडी पंचक्रोत बिबट्याचा वावर... दोन महिन्यांत चार शेळ्यांचा बळी...

 गहूखेल म्हसोबावाडी पंचक्रोत बिबट्याचा वावर...
दोन महिन्यांत चार शेळ्यांचा बळी...






आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी तालुक्यातील  सुलेमान देवळा,भोजेवाडी,गहुखेल, म्हसोबावाडी सह पंचक्रोशीत गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर होत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत काल रात्री म्हसोबावाडी गावातील शेतकरी मोहन बाबु शेकडे हे आपल्या मालकी हक्काच्या माळरानावर आपले कुरे चालायच्या साठी गेले असता सुमारे संध्याकाळ पाच वाचण्याच्या सुमारा त्यांची एक शेळी गायब असल्याचे लक्षात आले वनविभागाचे कर्मचारी बन्सी तादंळे व संपूर्ण कुटुंब शोध शोध करत असताना ती आज मयत अवस्थेत सापडली तात्काळ त्यांनी वनविभागाचे कर्मचारी बन्सी तादंळे सह पशुवैद्यकीय कर्मचारी खेडकर  यांना संपर्क साधला असता घटना स्थळी पंचनामा होऊन बिबट्यानेच त्या शेळीचा खतमा केल्याचे निष्पन्न झाले म्हसोबावाडी व पंचक्रोशीसह म्हसोबावाडीचे सरपंच शिवा शेकडे यांनी वनविभागाला लवकरच निवेदन देऊन लवकर त्या बिबट्याचा बंदोबस्त करु असा शेतकऱ्यांना दिलास दिला यावेळी शेतकरी मोहन शेकडे, सतिष शेकडे,वनविभागाचे कर्मचारी बन्सी तादंळे, कृष्णा बडे, बाबासाहेब बडे,अशोक बडे, अविनाश खोरदे उपस्थित होते .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.