आष्टी येथे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्यासाठी राज्यमंत्रिमंडळात मान्यता..
****************************
आ.सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश
*********************
आष्टी (प्रतिनिधी)-
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आष्टी येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय आज घेण्यात आला.हे न्यायालय व्हावे म्हणून आमदार सुरेश धस हे सतत पाठपुरावा करत असल्याने त्यांचा पाठपुराव्याला आज यश आले आहे.राज्य मंत्रिमंडळाने घोषणा करताच आष्टी तालुका वकील संघ व नागरिकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आष्टी तालुक्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.आतापर्यंत तालुक्यातील नागरिकांना बीडपर्यंत तब्बल ८२ किलोमीटरचा प्रवास करून न्यायालयीन कामकाज करावं लागत होते.आष्टीत न्यायालय उभारण्यात येत असल्यामुळे आता स्थानिकांचा वेळ,पैसा आणि श्रम वाचणार आहेत.तसेच या न्यायालयासाठी एकूण २५ पदांना मान्यता देण्यात आली आहे.सदर निर्णयामुळे आष्टी तालुक्यातील प्रलंबित प्रकरणांच्या निवारण प्रक्रियेला गती मिळणार आहे.या न्यायालयाच्या निर्णयाची मंत्रिमंडळाने घोषणा करताच आष्टी तालुका वकील संघ व नागरिकांनी पेढे वाटून आनंद साजरा करत आ.सुरेश धस व राज्य शासनाचे आभार संघाने मानले.
stay connected