हाजी याकूब तांबोळी यांचे निधन
आष्टी ( प्रतिनिधी ): जामखेड येथील हाजी याकुब तांबोळी यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते ८० वर्बाचे होते. त्यांचा दफनविधी कार्यक्रम शुक्रवारी जामखेड येथे कब्रस्तान या ठिकाणी करण्यात आला. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे अनेक कर्मचारी पदाधिकाऱ्यांसह मधुकर राळेभात, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन मारुती पठाडे, मौलाना खलील शामीर भाई आष्टी, पाटोदा, जामखेड परिसरातील शिक्षक बांधव नातेवाईक उपस्थित होते. त्यांनी रयत शिक्षण संस्थेत वरिष्ठ सहाय्यक म्हणून खर्डा, जामखेड, राशीन येथे काम केले होते. निवृत्तीनंतरही ते पेन्शनरचे विविध कामे करत होते. शैक्षणिक कामाच्या व्यतिरिक्त ते धार्मिक कामातही अग्रेसर होते. त्यांनी २००४ मध्ये हज यात्रा पूर्ण केली त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, मलेशिया, अशा विविध देशांचा प्रवास धार्मिक कामानिमित्त त्यांनी केला. ते हाजी अब्दुल हमीद तांबोळी यांचे ते वडील तसेच दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी मोहिद्दीन तांबोळी यांचे ते मामा होते.
stay connected