राष्ट्रीय श्रमण सेनेच्यावतीने एसटी को.ऑप. बँकेचे नवनिर्वाचित संचालक बालाजी शिदे यांचा सत्कार
नांदेड - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथील कार्यरत वाहतुक नियंत्रक बालाजी शिंदे याची एसटी को.ऑप. बँक लि. शाखा नांदेडच्या संचालकपदी एसटी को.ऑप. बँकेचे महाराष्ट्र राज्याचे एमडी (महाव्यवस्थापक) विजय ढगे यांनी नांदेड शाखेच्या संचालकपदी त्यांची निवड केल्याबद्दल दि.07 ऑगस्ट 2025 गुरूवार रोजी सायंकाळी ठिक 4 वाजता एसटी मध्यवर्ती बसस्थानक प्रमुख यांच्या दालनात राष्ट्रीय श्रमण सेनेचे महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष तथा कामगार नेते ॲड.विष्णू गोडबोले यांनी संचालक बालाजी शिंदे यांचा पुष्पहाराने ह्दय सत्कार करून अभिनंदन करून भावी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
एसटी को. ऑ. बँक नांदेड शाखेची स्थापना 1954 साली झाली असून आज 71 व्या वर्षात कार्यरत आहे. 27 हजार सभासद संख्या असलेल्या या शाखेची वार्षिक आर्थिक उलाढाल 4 हजार 500 कोटीची असून महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यात एसटी को. ऑप. बँकेचे 50 शाखा कार्यरत आहेत. यावेळी राष्ट्रीय श्रमण सेनेचे राज्याध्यक्ष तथा कामगार नेते ॲड.विष्णू गोडबोले यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, नवनिर्वाचित संचालक बालाजी शिंदे यांचा एसटीच्या कष्टकरी कामगार-कर्मचाऱ्यामध्ये प्रेमळ असे नाते असून भविष्यात त्यांनी बँकेच्या आर्थिक उलाढालीमध्ये बँकेचे सभासद व ठेवीदार यांना सहकार्याची भावना ठेवून कार्य करतीलच याचबरोबर कामगारांच्या अडी-अडचणीबद्दल मी आपल्या सर्वांसोबत सदैव सकारात्मक राहिन, असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन गुणवंत एच.मिसलवाड यांनी करून आपले विचार मांडले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, राष्ट्रीय श्रमण सेनेचे राज्याध्यक्ष ॲड.विष्णू गोडबोले, सत्कारमूर्ती तथा संचालक बालाजी शिंदे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवत एच.मिसलवाड, सहाय्यक वाहतुक निरीक्षक मयूर तेलंगे, लिपीक गुलाम रब्बानी, वाहक दत्तात्रय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रापम आगारातील कष्टकरी कामगार-कर्मचारी, बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
------------------------------------------------------------


stay connected