*गायरान हक्क अधिकारासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर, प्रा. किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तहसीलवर मोर्चा.*
*डॉ जितीन वंजारे यांनी खालापुरी येथील गायरान धाराकांसाठी बाजू लावून धरली*
शिरूर प्रतिनिधी :- संबंध बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गायरान जमीन असून प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणची गायरान जमीनी दलित शोषित पीडित वर्गातील आदिवासी भटके विमुक्त लोकांनी गायरान जमीन कसत आहेत गेल्या अनेक वर्षापासून बाप दादाच्या काळापासून ते जमीन कसत असून त्यांच्याकडे कागदपत्र नसल्याकारणाने शासनाकडे ते कागदपत्र सुपूर्द करू शकले नाहीत त्यामुळे 26 नोव्हेंबर 2006 च्या कायद्याप्रमाणे गायरान हक्क जमीन त्यांच्या नावे झालेली नाही परंतु गेल्या 30 ते 40 वर्षापासून ती गायरान जमन ते कसं आहेत त्यांच्या घरी सुशिक्षित कोणीही नसल्याकारणाने आज पर्यंत शासन दरबारी त्यांनी ते जमीन लावून घेतलेली नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे दिलीप माने व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी तहसील कार्यालय शिरूर कासार येथे वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे नेते प्राध्यापक किसन चव्हाण सर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, निरीक्षक पुरुषोत्तम वीर,शिरूर तालुका अध्यक्ष दिलीप माने , पाटोदा तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड प्रसिद्धी प्रमुख गणेश खेमाडे,तांगडे, जोगदंड, कवठेकर, सरपते, औसरमल, साळवे, मेघडंबर इत्यादी च्या मार्गदर्शनाखाली दिनांक 20 ऑगस्ट रोजी मोठा दणक्यात मोर्चा काढण्यात आला. शासन दरबारीं शिरूर तालुक्याच्या विविध प्रश्नांचे निवेदन देण्यात आले.
खालापूर येथील गायरान जमीन गेले 30 वर्षापासून येथील मातंग समाजाची लोक कसत होते ती जमीन जातीवादी मानसिकतेमधून ग्रामपंचायत खालापुरी तलाठी व ग्रामसेवक यांनी संगणमत करून एका खाजगी कंपनीला सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ग्रामपंचायत ठराव घेऊन सुपूर्ध केली. जर आदिवासी भटक्या विमुक्त आणि एससी एसटी लोकांप्रति मनामध्ये चांगली भावना असती तर येथील सरपंच ग्रामसेवक यांनी ही जमीन अगदी मोफत सौर ऊर्जा प्रकल्पाला देऊ केली नसती,परंतु केवळ जातिवाद मनामध्ये ठेवून ही जमीन ग्रामपंचायत ने खाजगी कंपनीला वर्ग केली आहे. सौरऊर्जा तयार करणारी कंपनी गायरान धारकांच्या जमिनी घेते मग खालापुरी गावासाठी विद्युत मोफत देईल का असा सवाल यावेळी डॉ जितीन वंजारे यांनी केला.तरी हा शेतकऱ्यावर गायरान धारकांवर झालेला अन्याय असून तो प्रकल्प तात्काळ हटवा आणि ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेचा ठराव देणाऱ्या सरपंच ग्रामसेवक वा तलाठी यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा दलित नेते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केली. त्यावर तहसीलदार साहेबांनी तुमचे प्रकरण माझ्या अखतारीत नसून मी हे निवेदन मा जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करतो आणि हवी ती कार्यवाही करतो असे आश्वासन दिले.
या आंदोलनाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष दिलीप माने, सामाजिक कर्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर, चंदू औसरमल, यांनी केले होते तर या आंदोलनाला प्रमुख मार्गदर्शक राज्याचे नेते प्रा किसन चव्हाण सर, जिल्हाध्यक्ष अजय सरवदे,खंडू जाधव, ज्ञानेश्वर कवठेकर, पूरुषोत्तम वीर,डॉ गणेश खेमाडे, राजेश जोगदंड, भारत तांगडे, भीमराव औसरमल,सुदेश पोतदार, युवराज सोनावणे,सचिन मेघडंबर, लक्ष्मण गायकवाड, वैजिनाथ खाडे, मनोहर औसरमल, सचिन यंकुळे, अंबादास खोपडे, अर्जुन गुंडाळे, बाजीराव धनवटे, मोहन मेन्दाड, सौ देवकतेमॅडम,बर्डे मॅडम इत्यादी सह अनेक कार्यकर्ते नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.मोर्चा जिजामाता चौक शिरूर येथून चालू झाला तर थेट तहसील वर धडकला विविध मागण्या, घोषणा, आणि हलगी व डीजे वाजवत मोर्चा तहसीलदार यांच्या पर्यंत घेऊन गेलो. तहसीलकार्यालयावर पोलिसांनी गेट वर अडवण्याचा प्रयत्न केला पण वंचित चे तडफदार नेते प्रा किसन चव्हाण सरांनी तहसीलदार यांची कान उघडणी करायची आहे म्हणून आम्हाला त्यांना भेटावं लागेल म्हणत आत प्रवेश केला. तहसीलदार बाहेर या, बाहेर या घोषणा करत तहसीलदार साहेबाना बाहेर बोलावून गोर गरीब शेतकरी कष्टकऱ्यांच्या छोट्या मोठ्या प्रश्नावर जाब विचारायचा आहेत,आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आता आलोत याच्या दुप्पट संख्येने येऊ त्यामुळे मागण्या मान्य करा पाठपुरावा करा भ्रषचार करणाऱ्यावर गुन्हे नोंद करा असे आदेश दिले. खालापुरी येथील विषय गंभीर असून तेथील भित्रे शेतकरी आहेत त्यांना न्याय द्या म्हणत तहसीलदार साहेबाना निवेदन दिले, यावेळी पाचशे गायरान धाराकांचे डॉक्युमेंट फायली मा तहसीलदार साहेबाना दिल्या त्यांच्या नावे तात्काळ गायरान जमिनी करा तलाठी यांच्याकडून अहवाल मागून घ्या असे आदेश दिले. वंचित चे राज्य महासचिव प्रा चव्हाण सर, जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर , शिरूर तालुक्षध्यक्ष दिलीप माने,पाटोदा तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी तहसील वर भाषणे केली आणि विविध मुद्दे मांडले, एम आर इ जि एस, घरकुल योजना रमाई, पंतप्रधान व शबरी घरकुल योजना यांना मंजुरी साठी दलाल सरपंच अधिकारी पैसे घेतात, शासकीय पाच ब्रास वाळू देण्यात यावी, विविध शासकीय योजनाना मंजुरीसाठी पैसे घेतले जातात यावर तहसीलदार साहेबाना कार्यवाही करण्यासाठी सांगितले.


stay connected