मंगरूळ येथे साहित्यरत्न डॉ आणाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
लोहा :- चंद्रकांत वाघमारे
लोहा तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली .
साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ आणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मंगरूळ गावातील गावकऱ्यांनी सहभाग घेऊन जयंती जोरदार पणे साजरी केली.
या दरम्यान गावातील प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते .
लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गावातील थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.लहान मुलांनी यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समाजकार्याची माहिती देऊन त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. पंचक्रोशीतील मातंग समाजाच्या नेते मंडळी यांनी आपल्या मनोगतातून मातंग समाजाच्या विकासासाठी आपल्या मागण्या, अपेक्षा यावेळी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे संचालन दत्तात्रय नामुळे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोक स्वराज्य जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रा रामचंद्र भरांडे,लोहा नगरपालिकेचे माजी नगरसेवक पंचशील कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जयंती मंडळाचे अध्यक्ष हनुमंत भिवाजीराव
नामुळे, उपाध्यक्ष रोहित संग्राम नामुळे,लोकनियुक्त सरपंच किरण ज्ञानेश्वर पाटील हाके, तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष धीरज माधवराव हाके, लोक स्वराज्य जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा जयंतीचे प्रमुख वक्ते प्राध्यापक रामचंद्र भराडे सर, माजी सरपंच प्रभाकर धोंडीबा पाटील शिंदे, ज्ञानोबा बापूराव पाटील शिंदे, पोलीस पाटील माधव किसन पाटील शिंदे, प्राध्यापक विशाल
गोन्टे सर, आरोग्य सेवक दत्तात्रय माधव नामुळे, सामाजिक कार्यकर्ते योगेश गोंटे, शिल्पकार राहुल नामुळे, विजय नामोळे ,अजय नामुळे ,सिद्धेश्वर गोरे , प्रदीप नामुळे,विकास नामुळे, पांडुरंग नामुळे, राहुल वाघमारे, कैलास वाघमारे ,राजू वाघमारे, माधव गोरे, संतोष नामुळे, संजय नामोळे, मंगेश नामुळे, विशाल नामुळे, संदीप नामुळे, किशोर नामुळे,साहेब गोरे, राजू वाघमारे, प्रल्हाद वाघमारे ,विष्णू वाघमारे,गोविंद नामुळे, संभाजी नामुळे व व सर्व समाज बांधव व गावकरी उपस्थित होते.


stay connected