*अंबिकानगर येथे नवीन मंदिरात मुंबादेवीची मूर्तीस्थापना व सप्ताह संपन्न-डॉ जितीन वंजारे*
अंबिकानगर:- अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी व बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या दलित भटक्या विमुक्तांचं गाव म्हणून ओळख असलेल्या अंबिका नगर येथे मुंबादेवीची नवीन मंदिरामध्ये स्थापना करण्यात आली. टाकळीमानुर या गावालगत असणाऱ्या अंबिका नगर येथील मंदिरामध्ये मुंबादेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. परिसरातील नामवंत पाच ब्राह्मणांच्या हस्ते व महामंडलेश्वर त्रिविक्रमानंद सरस्वती महाराज शास्त्री इंदूवाशिनी देवस्थान मठ पिंपळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मूर्ती स्थापना संपन्न झाली. अंबिका नगर या गावातील देवीचे भाविक भक्त, परिसरातील वारकरी भाविक-भक्तजन यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवी मंडळ समितीतर्फे आलेल्या सर्व भाविक भक्तांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले, पाच दिवस चाललेल्या या सप्ताहात दिवसभर दोन वेळा अन्नदान पंगत आणि शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे नियोजन होते. या पाच दिवसात देवींची छबीना काढून गावात वाजत गाजत मिरवणूक काढली गेली, गावातील सर्व भाविक भक्त यावेळी उपस्थित होते. येथील भटके विमुक्त तिरमली समाजाचे लोक मुंबई ला सहा महिन्यासाठी कामासाठी जातात आणि मुंबई येथील ग्राम दैवत मुंबादेवी ची मनोभावे सेवा करतात, त्यांचं अतोनात श्रध्येच ठिकाण म्हणजे मुंबादेवी त्यामुळे आपल्या गावातही मुंबादेवी च मंदिर असावं अशी मनोमन इछया येथील ग्रामस्थ्यांची होती आणि म्हणून सर्वांच्या वर्गणीतून याठिकाणी छान स देवीचं मंदिर बांधून तेथे दरवर्षी सप्ताह भरवण्याचं त्यांनी ऐवजीले आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरकर यांचा आणि माजी सरपंच फुंदे यांचा सत्कार शाल श्रीफळ देवी कमिटी तर्फे करण्यात आला.देवी मंदिर कमिटी मध्ये बाळू फुलमाळी, अशोक फुलमाळी, प्रकाश फुलमाळी, राहुल फुलमाळी, नवनाथ फुलमाळी, लक्ष्मण फुलमाळी, सुनील फुलमाळी, अशोक फुलमाळी, बाबासाहेब फुलमाळी, राजेंद्र गुंडाळे,शहादेव गुंडाळे, युवराज पालवे,राजेंद्र काळे,बाबासाहेबा फुलमाळी, रावसाहेब फुलमाळी, बाप्पासाहेब फुलमाळी, संजय फुलमाळी,रामा फुलमाळी, बाप्पू फुलमाळी ईत्यादीसह अनेकानी परिश्रम घेतेले आणि या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात अंबिकानगर ग्रामस्थ व परिसरातील भक्तजन उपस्थित होते.


stay connected