सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी ,पुणे ३५ मध्ये पर्यावरण पूरक गणपती बनविणे कार्यशाळा संपन्न.

 सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी ,पुणे ३५ मध्ये पर्यावरण पूरक गणपती बनविणे कार्यशाळा संपन्न.





निगडी(पुणे): पर्यावरणाचे महत्त्व लहानपणीच मुलांना समजणे गरजेचे असते.तसेच आपल्या हाताने गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती बनविणे,तिला सजवणे याचा आनंद खूप काही ऊर्जा देऊन जातो.म्हणून आज सोमवार दिनांक २५/८/२०२५ रोजी शाडू मातीपासून गणपती बनविणे कार्यशाळा सौ.प्रतिमा काळे मॅडम यांनी इयत्ता ५ वी ते ७ वी मधील स्काऊट व गाईड तसेच शाळेतील इतर विद्यार्थ्यांची घेतली .मुलांनी सुंदर अशा गणपती मूर्ती बनविण्या.यासाठी सर्व सहकारी शिक्षकांचे  मोलाचे सहकार्य लाभले.मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता.यासाठी मा.संस्थापक श्री.गोविंद दाभाडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका सौ.गुरव मॅडम,उप मुख्याध्यापक श्री.बच्चे सर यांची उपस्थिती लाभली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.