मराठ्यांची मुंबई वारी; चिंचाळा-राघापूर ग्रामस्थांना सरपंच पंडित पोकळें कडून जाण्यासाठी मोफत सोय

 मराठ्यांची मुंबई वारी; चिंचाळा-राघापूर ग्रामस्थांना सरपंच पंडित पोकळें कडून जाण्यासाठी मोफत सोय 



२९ ऑगस्टला निघणाऱ्या मराठा आरक्षण वारीला चिंचाळा-राघापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने येणार


आष्टी । प्रतिनिधी


मराठा आरक्षण आंदोलनाचे पर्व दुसरे सुरू झाले आहे. या पर्वाची सुरुवात आणि शेवट मुंबईतील आझाद मैदानावरच होणार असल्याने संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी आंतरवली ते मुंबई आझाद मैदान प्रवास मराठा आरक्षण वारीचा ठरवला आहे या वारीसाठी मराठा बांधव कोटीने येणार आहेत. या मराठा आरक्षण वारीत आष्टी तालुक्यातील चिंचाळा- राघापूर ग्रामस्थांना जाण्या येण्याची सरपंच पंडित पोकळे यांनी मोफत सोय केली आहे.आंदोलनात नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवणारे चिंचाळा- राघापूर ग्रामपंचायतचे सरपंच पंडित पोकळे यांनी अंतरवाली ते मुंबई निघणाऱ्या मराठा आरक्षण वारीला जाण्यासाठी गावातील नागरिकांना मोफत गाड्यांची व्यवस्था केली आहे. जास्तीत जास्त मराठा बांधव या मराठा आरक्षण वारीत सहभागी व्हावेत यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. २७ ऑगस्ट पासून सुरू होणारी ही मराठा आरक्षण वारी अंतरवली येथून निघणार आहे ज्या बांधवांना २७तारखेला सहभागी व्हायचंय त्यांनी २७ तारखेला ज्यांना २८ त्यांनी २८ ला आणि ज्यांना २९ ऑगस्ट ला आझाद मैदानावर डायरेक्ट जायचं आहे त्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने या मराठाआरक्षण वारीसाठी आझाद मैदानावर यावे असेही आव्हान चिंचाळा-राघापूर गावचे सरपंच पंडित आण्णा पोकळे यांनी केले आहे.






माझे कर्तव्य म्हणून गाड्यांची व्यवस्था - सरपंच पंडित पोकळे


मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आमच्या चिंचाळा व राघापूर गावानं सक्रिय सहभाग नोंदवला आहे. हा मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी होईपर्यंत आमचे ग्रामस्थ सक्रिय सहभागी असतील म्हणूनच त्यांना या लढ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी  होता यावे या हेतून व सरपंच या नात्याने ग्रामस्थांना जाण्या येण्यासाठी गाड्यांची मोफत व्यवस्था केली आहे हे मी कर्तव्य म्हणून करत आहे.


पंडित पोकळे
सरपंच चिंचाळा-राघापूर ग्रामपंचायत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.