आनंदवाडी येथे आज ह.भ.प.बबन महाराज तर उद्या ह.भ.प.भागवत उंबरेकर महाराज यांचे कीर्तन

 आनंदवाडी येथे आज ह.भ.प.बबन महाराज तर उद्या   ह.भ.प.भागवत उंबरेकर महाराज  यांचे कीर्तन

------------------



-------------------

आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी तालुक्यातील  आनंदवाडी येथे संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा व संत नामदेव महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त दि.१८ ते २५ जुलै  २०२५ या कालावधीत सावता महाराज चरित्र कथा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा होत आहे.संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त आनंदवाडी येथे आज गुरुवार दि.२४ जुलै रोजी ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल व उद्या शुक्रवार दि.२५ जुलै  रोजी वृध्देश्वर देवस्थानचे अध्यक्ष   ह.भ.प.भागवत महाराज उंबरेकर   यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.



   अखिल विश्वातील मानव जातीतील जिवंत कर्मयोग व भक्ती योग शिकवणारे महान संतश्रेष्ठ ज्ञानवैष्णव श्री संत नामदेव महाराज व श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा पंढरीश पांडुरंगाच्या कृपेने संत वै.रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या आशीर्वादाने आणि ह.भ.प. भागवत महाराज उंबरेकर यांच्या   मार्गदर्शनाखाली हा   अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सप्ताह समितीने केले आहे.



या सप्ताहात काकडा आरती, विष्णु सहस्त्रनाम व प्रार्थना,सावता महाराज चरित्र, हरिपाठ,हरिकीर्तन व हरिजागर आदि धार्मिक कार्यक्रम होत आहेत.

या सप्ताहात ह.भ.प.आदिनाथ महाराज दानवे, ह.भ.प.सोमीनाथ  महाराज मेटे, ह.भ.प.दिपाली खिळे महाराज, ह.भ.प.दादा महाराज राऊत, ह.भ.प.भाऊसाहेब   महाराज अन्हाड, ह.भ.प.निवृत्तीदादा   महाराज बोडखे  यांचे हरिकीर्तन झाले आहेत.आज गुरुवारी संत मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल  यांचे हरिकीर्तन आहे.उद्या शुक्रवारी  सकाळी १० ते १२ यावेळात ह.भ.प.उंबरेकर  महाराज यांचे  काल्याचे कीर्तन होणार आहे.यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने भावीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ आनंदवाडी  यांनी केले आहे.    

------------------




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.