वधु -वर सुचक व परिचय मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - शिवाजीराव पाचे

 वधु -वर सुचक व परिचय मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे -  शिवाजीराव पाचे 


     आष्टी ( प्रतिनिधी )

      समाजामध्ये बेरोजगारी, आरक्षण, शिक्षण व नोकरी हे प्रश्न जसे ज्वलंत आहेत, तसेच तरुण-तरुणींचे विवाह जुळवणे हा सुद्धा तितकाच ज्वलंत प्रश्न आहे . समाजामध्ये मध्यस्तांची संख्या कमी झाली आहे.भाऊबंद आणि नातेवाईक सुद्धा विवाह जुळवण्यासाठी पुढे येत नाहीत! म्हणून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आष्टी, जिल्हा बीड येथे वधू वर मेळावा आयोजित केला आहे. सदरचा मेळावा राजमाता जिजाऊ विद्यार्थी वस्तीगृह व मंगल कार्यालय आष्टी येथे दिनांक 27 जुलै, 2025 रोजी, *रविवारी* सकाळी 08:30 ते दुपारी 04:30 या वेळेत होईल. मेळावा फक्त मराठा समाजातील वधू वर यांच्यासाठी आहे. अधिक माहितीसाठी ॲड. सीताराम पोकळे, पत्रकार 94 21 63 80 55 यांच्याशी संपर्क साधावा. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा वधु वर कक्षाचे अध्यक्ष शिवश्री शिवाजीराव पाचे यांनी केले आहे. 

      या मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री तथा आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघाचे विद्यमान *आमदार सुरेश आण्णा धस* यांच्या शुभहस्ते होणार आहे .वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पाथर्डी चे कार्यकारी सल्लागार मा. जे.आर . पवार सर हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. त्याचप्रमाणे मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री अशोकजी ठाकरे साहेब, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई माने, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री धनंजय शेंडगे व शिवश्री नागनाथ जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शिवमती संगीताताई शिंदे, जिजाऊ ब्रिगेड अहिल्यानगरच्या अध्यक्षा शिवमती संपूर्णताई सावंत  आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

       बीड, जालना ,छ. संभाजीनगर, परभणी, सोलापूर, अहिल्यानगर व संपूर्ण महाराष्ट्रातून या मेळाव्यास वधुवर उपस्थित राहणार आहेत. असे संयोजकांनी सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.