राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी बालाजी धनसडे तर मराठवाडा सचिव म्हणून चंद्रकांत वाघमारे यांची निवड
लोहा:-(चंद्रकांत वाघमारे)
येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 27/ 07/ 2025 रोजी दुपारी दोन वाजता राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण संवाद बैठक संपन्न. या बैठकीचे आयोजक , ऊपसंपादक तथा पत्रकार चंद्रकांत वाघमारे, पत्रकार बाळासाहेब बुद्धे यांनी या बैठकीचेआयोजन केले होते . अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मीकांत कस्तुरे प्रदेश प्रदेश सचिव शेख मकबुल अहेमद, अँडव्होकेट
गणेश बिनगे, ईरशाद पठाण, यांच्या प्रमुख उपस्थितीत उर्वरित जिल्हा कार्यकारिणीची कंधार व लोहा तालुका कार्यकारिणीची तसेच राज्य कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली या बैठकीत जेष्ठ पत्रकार बालाजी धनसडे यांची महाराष्ट्र राज्य बहुभाषिक पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी तर चंद्रकांत वाघमारे यांची मराठवाडा सचिव पदि निवड झाल्याची घोषणा राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मा.श्री. लक्ष्मीकांतजी कस्तुरे यांनी केली या विशेष बैठकीमध्ये नियुक्तीपत्र प्रधान करण्यात आले लोहा तालुका ईतर कार्यकारिणीची निवड करण्यात आली, कीर्तीमाला महाबळे लोहा तालुकाध्यक्ष तर प्रेमानंद कांबळे सरचिटणीस उत्तम हंकारे उपाध्यक्ष केशव कंधारे सचिव हनुमंत कंधारे सहसचिव तर कंधार तालुका अध्यक्ष म्हणून चंद्रकांत मोरे उपाध्यक्ष म्हणून दिलीप शंकपाळे सचिव म्हणून व्यंकटी टोकलवाड यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले. याच बैठकीत मराठवाडा सचिव म्हणून मा . श्री.चंद्रकांत वाघमारे तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब बूद्धे यांची निवड करण्यात आली व नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मीकांतजु कस्तुरे म्हणाले की 1991 पासून बालाजी धनसडे हे पत्रकारिता व आंबेडकर चळवळी मधील सक्रिय असून ते निरर्भिड पत्रकार म्हणून ओळखले जातात.
त्याची दखल घेऊन बहुभाषिक पत्रकार संघाने त्यांचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड करण्याचे ठरवून त्यांची नियुक्ती केली आहे त्यांच्या निवडीमुळे निश्चितच पत्रकार संघाला नवी दिशा मिळेल अशी आशा व्यक्त करून पत्रकार बांधवांनी बालाजी धनसडे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भीडपणे लिखाण करून पत्रकारावरील हल्ले थांबवण्यासाठी पत्रकाराचे मजबूत संघटन उभे राहावे व प्रखर लढा उभारावा त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले यावेळी नव्यानेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त झालेले जेष्ठ पत्रकार बालाजी धनसरे म्हणाले की पत्रकारिता हे क्षेत्र जोखीमेचे जरी असले तरी पत्रकारांनी निर्भीडपणे लिखाण करून काळे धंदे भ्रष्टाचार यांच्याविरुद्ध आपल्या लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवावा तसेच गोरगरीब जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी प्रखर लिखाण करून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा लोकशाहीमध्ये पत्रकार ची भूमिका नेहमीच अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध अग्रेसर असली पाहिजे तरच अन्याय अत्याचार दूर होतील यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी आपल्या लेखणी चालवाव्यात असे आव्हान केले यावेळी
विष्णू धनसडे मोहन सोनकांबळे, विष्णू गायकवाड, कुलदीपक सचिन धनसडे, रविकांत धनसडे इत्यादी सह अनेकांची उपस्थिती होती ज्येष्ठ पत्रकार बालाजी धनसडे यांची पत्रकार संघाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे आडगाव येथे त्यांचे गावकऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले यावेळी बाबासाहेब शिरसागर, दशरथ धनसडे प्रभाकर धोंडीबा शिरसागर विश्वंभर
शिरसागर पोलीस पाटील आडगाव भागवत पाटील शिरसागर बब्रूवान शिरसागर ज्ञानेश्वर शिरसागर जनार्दन शिरसागर बाळा पाटील विकास शिरसागर शिरसागर शहाजी शिरसागर माजी सरपंच संजय धनसडे गफार शेख शाबुद्दीन शेख शादुल शेख उद्योजक पीरसाब साबुद्दीन शेख अलाउद्दीन शेख यादव कंधारे नागेश कंधारे वसंत धनसडे दीपक क्षीरसागर माजी चेअरमन परसराम क्षीरसागर अर्जुन शिरसागर जयसिंग शिरसागर चेअरमन सदाशिव आप्पा होळगे रामदास शिरसागर हरिभाऊ शिरसागर व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते


stay connected