दि.23 जुलै सामाजिक बांधिलकी जोपासत मुलीचा वाढदिवस साजरा
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वेळापूर मुली शाळेतील शिक्षिका श्रीम.किरण घाडगे यांनी आपली कन्या शिवश्री शैलेश माने हिच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळापूर मुली या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या १८० विद्यार्थिनींना रिबन, बेल्ट व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शाळेतील विद्यार्थिनींना गरजेच्या साहित्याचे वाटप करून त्यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. गेल्या नऊ वर्षापासून दरवर्षी त्या हा उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या कार्याचे कौतुक करत मुख्याध्यापक श्री तांबोळी सर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
*शाळेच्या वतीने मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी व सहकारी शिक्षकांनी श्रीम.किरण घाडगे यांचे आभार मानले व शिवश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
stay connected