महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघाच्या राज्य अध्यक्ष पदी माधव सावंत यांची निवड
रविवार दिनांक 13/7/25 रोजी सायंकाळी सात वाजता महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ राज्य कोअर कमेटी ची Online सभा राज्य कार्याध्यक्ष माधव सावंत बीड यांचे अध्यक्षतेखाली व श्रीरामजी परबत संस्थापक नेते यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. प्रथमतः राज्य अध्यक्ष स्वगीॅय संभाजीराव पाटील यांना विनम्र अभिवादन करून दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.माननीय राज्य सरचिटणीस भाऊसाहेब निकम यांनी संघटने बाबत महत्त्वपूर्ण मुद्दे सर्वांसमोर ठेवले. रजारोखीकरण या विषया संदर्भात मागे संभाजीराव पाटील यांचे अधिपत्याखालील कोणती कारवाई करण्यात आलेली आहे ती ईंतभुत माहीती देण्यात आली . रजारोखीकरण शुद्धीपत्रक फाईल प्रवास कुठून कुठ पर्यंत झाला या बाबत सदस्यांना माहीती देण्यात आली.राज्य अध्यक्ष संभाजीराव पाटील यांचे निधन झाल्या मुळे राज्य अध्यक्ष पद रिक्त झालेले आहेत त्या मुळे संघटनेतील कार्य सुरळीत सुरू ठेवणे करीता नियमानुसार व संघटनेच्या उपविधी नुसार राज्य अध्यक्षांचा प्रभार राज्य कार्याध्यक्ष माधव सावंत यांचे कडे देण्यात यावा अशा प्रकारची सुचना राज्य उपाध्यक्ष अशोक चौधरी यांनी मांडली,त्या सुचनेचा आदर ठेवून माननीय सरचिटणीस भाऊसाहेब निकम यांनी माधव सावंत राज्य कार्याध्यक्ष यांचे कडे "राज्य अध्यक्ष "या पदाचा पदभार देण्यात येत आहेत असे जाहीर केले.व सर्व कोअर कमेटी सदस्य यांनी अनुमोदन दिले. पुढील संघटनात्मक बाबी,संघटना अभिलेख,आथीॅक व्यवहार संदर्भात अभिलेख,उपविधी व ईतर जे काही साहीत्य असतील ते सरचिटणीस आणि प्रभार नियुक्त राज्य अध्यक्ष यांनी ताब्यात घेऊन कार्यवाही करावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले.सभेला माधव सावंत,भाऊसाहेब निकम,परबत दादा,अशोक चौधरी,दत्तात्रय जपे,लिलाधर दादा सपकाळे,औदुंबर दराडे,साहेबराव बेंगाल उपस्थित होते. नवनियुक्त महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ चे राज्य अध्यक्ष यांची नविन राज्य कार्यकारीणी गठीत होईपर्यंत व फेरबदल होईपर्यंत राज्य अध्यक्ष म्हणून राज्य कार्याध्यक्ष माधव सावंत यांचे कडे राज्य अध्यक्ष पदाचा पदभार देण्यात आलेला आहे.नवनियुक्त राज्य अध्यक्ष माधवराव सावंत यांचे तमाम राज्यातील उच्च श्रेणी मुख्याध्यापक बांधव/भगीनी च्या वतीने व राज्य कोअर कमेटी च्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या .
stay connected