नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक २ अंतर्गत दौलावडगाव येथे सोमवारी मार्गदर्शन
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक २ अंतर्गत मौजे दौलावडगाव ता. आष्टी जि. बीड येथे सोमवार दि.२३/०६/२०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजता ग्रामस्तरीय सूक्ष्म नियोजन व प्रभातफेरी जनजागृती कार्यक्रम योजने विषयी माहिती पर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी या प्रसंगी सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे . या योजनेचे उदघाटक श्री. बाबासाहेब नानाभाऊ पिसोरे (कृषिरत्न कृषिभुषण महाराष्ट्र राज्य) हे असणार आहेत तसेच प्रमुख उपस्थिती श्री. सुभाष साळवे (जिल्हा आधिक्षक कृषी अधिकारी बीड) , श्री. बाळासाहेब नितनवरे (कृषी उपसंचालक बीड) , श्री. उद्धव गर्जे ( उपविभागीय कृषी अधिकारी बीड ) , श्री. गोरख तरटे ( तालुका कृषी अधिकारी आष्टी) , श्री. प्रमोद खुटाळे (मंडळ कृषी अधिकारी धानोरा ) , श्री. संतोष शिंगारे (ता. समन्वयक पाणी फौडेशन) हे उपस्थित राहणार आहेत .
सर्व अधिकारी व कर्मचारी वृन्द तालुका कृषी अधिकारी आष्टी कार्यालय सर्व ग्रामस्थ व प्रगतशील शेतकरी व भजनी मंडळ दौलावडगांव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे . यात उल्लेखनीय सहभाग - उमेद महिला बचतगट दौलावडगाव ICICI फौंडेशन, प्रथम एज्युकेशन फौंडेशन, पाणी फौंडेशन, वॉटर फौंडेशन, आकार फौंडेशन, महाराष्ट्र ग्रामीण बँक, सरस्वती विद्यालय दौलावडगाव, आयडेल इंग्लिश स्कूल दौलावडगाव केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौलावडगांव, त्रिदल संघटना दौलावडगांव यांचा राहील तर कार्यक्रमाचे निमंत्रक ग्राम कृषी विकास समिती / ग्रामपंचायत दौलावडगाव हे आहेत . या प्रसंगी सर्व ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कृषी खात्यामार्फत करण्यात आले आहे .
stay connected