*दारात गाय आणि घरात माय जो पर्यंत आहे तोपर्यंत माणुसकी जिवंत आहे-डॉ जितीन वंजारे*
मी पिंपरी चिंचवड सारख्या शहरांत मोठ हॉस्पिटल थाटलं चालवलं पैसे कमावले,एल अँड टी सारख्या भारतातील नव्हे तर जगातील नंबर वन असणाऱ्या कंपनी च्या मेडिकल सेंटर ला लोणावळा सारख्या ठिकाणी मेडिकल ऑफिसर म्हणून काम केले,पण शहरांत अन ग्रामीण भागात सेवा देताना मला ग्रामीण भागात आणि विशेष जिथे सेवा पोहचली नाही जिथे लोकांचे आरोग्य सेवा वाचून हाल होतात तिथे सेवा द्यायला आवडत. मी आजपर्यंत वीस हुन अधिक ठिकाणी सेवा दिली आहे. पैसा कमावन हाच फक्त उद्देश असता तर मी एका ठिकाणी सेवा देऊन शहर सोडलच नसत, पण सेवेचा आनंद घ्यायला हवा, सेवा आपल्या फक्त अर्थार्जनाच साधन नसून ती आपली आवड आणि पॅशन असायला हवं. लोक एका जागेवरून दुसरीकडे जायला घाबरतात कस होईल? काय होईल? पण पैसा कामावणे हे आपलं उद्दिष्ट नसून सेवा गोर- गरीब,तांडा,वस्ती, वाडी आणि गावापर्यंत पोहचली पाहिजे त्यातून आपल्या कामाची ओळख आणि लोकसंपर्क वाढवणं हेच माझं ध्येय आहे असे सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध डॉक्टर डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी म्हटले आहे.लोकांना चांगली सेवा ते पण ग्रामीण भागात देण हाच आपला मोटो आहे बऱ्याच लोकांत विविध आजाराविषयी भीतीच वातावरण आहे, काही गुप्त रोगाविषयी माणसं बोलायला टाळतात, काही संसर्गजन्य रोग लपवून ठेवल्याने आक्ख घर बरबात होत पण ह्या लोकांना आरोग्य सल्ला देऊन त्यांना सरकारी यंत्रनेला जोडून त्यांच्यावर योग्य उपचार करणे महत्वाचे आहेत आणि ते काम आपण जोमाने करत आहोत याचा अभिमान वाटतो. सेवेतून पैसे भेटतात त्याच बरोबर योग्य सेवेचा यथार्त आनंद भेटतो कोणतेही काम मनातून केल्यास यश नक्की प्राप्त होत. मला नवीन जागेवर जायला अजिबात भीती वाटत नाही कारण आपल्यात ती कॅपॅसिटी आहे की आपण त्या त्या पातळीवर सिद्ध होऊ आणि झालेलो आहे. फक्त जनसंपर्क तो पण सेवेतून वाढवण हाच माझा उद्धेश असल्याने आपली ही भ्रमंती असतें. जीवनात डॉक्टर होऊन किती पैसा कामावला त्यापेक्षा मानस किती कामावली, किती लोकांच्या कामाला आलात ह्याला मी प्राधान्य देतो.
ग्रामीण भागात दारात गाय आणि घरात माय असतें माझ्या शेतकरी कष्टकरी माणसाची माय कधीच वृद्ध आश्रमात नसणार आहे,कारण उदार अंतकरणवादी माझा शेतकरी मांजरी कुत्री गाय बैल जनावरे पाळतो त्यांना पोसतो तर मानस का नाही पोसणार आणि म्हणून शेतकऱ्यांची वृद्ध आई तुम्हाला कधीच वृद्धआश्रमात दिसणार नाही. मी काल परवा सुपेकर वस्ती येथे एक पेशंट कडे गेलो होतो वय एकशे पाच वर्ष शंभरी पलटलेली ही आई पाच सहा लेक-लेकीची आई,दोन लेकी सध्या जवळ आलेल्या होत्या मुलं नातवंड तिच्या तिमतीला होती आणि इतकं जून झाड ते तळहाताप्रमाणे सभाळीत होते. त्यांच्या मुलाचा फोन आला सर काहीही करा पण माझ्या आईला सलाईन लावायला याच,हे प्रेम फक्त शेतकऱ्यात दिसत,आजीला दोन वेळा जाऊन सलाईन लावल्याने आजी आता बऱ्या आहेत पण म्हातारपनाच दुखणं वाईटच.मायेचा गोतावळा जमवणे,आपल्याला मानस धरून ठेवणे,आपली सेवा देणे अन सेवा करून घेणे हेच शेतकऱ्यांवर संस्कार असतात म्हणून शेतकरी घरात आई आणि दारात गाय जपतो. ग्रामीण भागातील ही प्रेमाची मानस जपताना मला अत्यानंद होतो. पैसा कमी की जास्त पण हे आपुलकीने एक डॉक्टर म्हणून दिलेलं प्रेम पैश्यात मोजता येत नाही. मला एखाद्या रुग्णांकडे व्हिसिट ला गेल्यावर उशीर झाल्यास ते आदराने जेऊ घालतात, शेंगा,पापड्या,लोणचं, अन आंबे सीताफळ,भाजीपाला जे असल ते देतात हे पैशात मोजता न येण्याजोग प्रेम असत. ग्रामीण भागातील लोक मायाळू असतात. शहरातील लोकांना सगळंच पैशात मोजायची सवय असतें. आम्हाला दोन पैसे कमी आले तरी आम्ही प्रेमाच्या मायेच्या परीघात अग्रस्थानी असू. ग्रामीण भागातील घराबाहेर गाय अन घरात माय जोपर्यंत आहे तो पर्यंत माणुसकी जिवंत राहील. आणि युद्ध भांडण मारामारी काहीही होऊ दे ग्रामीण भागात शेजारी उपाशी राहिला नाही पाहिजे, भुकेजलेल्या ला जेवण आणि तहानलेल्याना पाणी देऊ, बाकी झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरावा, बांधवरील गचपण जाळू नका, त्याच्या अगीने उन्हामुळे मोठमोठी झाडे जळून खाक झाली आहेत.ग्लोबल वार्मिंग वाढली आहे ती कमी करण्यासाठी झाडे लावलीच पाहिजेत,जल-जमीन अन जंगल वाचवू, प्राणी पशु पक्षी जगवू, त्यांना पाणी ठेवा, जीव वाचवा त्यांना चारा घाला पाणी द्या, जगा आणि जगूद्या आणि माणुसकी टिकऊया इतकंच.....
*आपलाच मा. सम्राट डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर 9922541030*
stay connected