गंभीर मारहाणीच्या गुन्ह्यातून शिवाजी बनसोडे यांची निर्दोष मुक्तता
आष्टी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल.
आष्टी। प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील कानडी खूर्द येथील घटनेची हकीकत दि २ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास कानडी खुर्द येथील महिला रखमा नामदेव बनसोडे व फिर्यादी अशोक बनसोडे राहणार कानडे खुर्द हे जात असताना इसम नामे शिवाजी बबन बनसोडे हा फिर्यादीची पत्नी शुभांगी बनसोडे हिच्या जवळ आला व शेतात जायचे नाही असे म्हणाला व त्याने उजव्या हाताचे करंगळीचे बोटाचा चावा घेऊन लाथा बुक्याने मारहाण केल्याची व त्याची चुलती नामे अरुणा न्यानेश्वर बनसोडे हीच लाकडी काठीने मारहाण केली व तिच्या उजव्या हाताचे मनगटाला मुका मार दिला व जीवे मारण्याची धमकी दिली व सर्वांनी उपचार घेतले असे आशयाची तक्रार अंभोरा पोलिसात दिली तपासी अंमलदार यांनी तपास करून दोषारोप पत्र मे. कोर्टात दाखल केले प्रकरणात आरोपीविरुद्ध वेगवेगळे सहा गंभीर स्वरूपाची भारतीय दंडविधान संहिता ची वेगवेगळे कलमे लावली व न्यायालयात साक्षी पुरावा होऊन सात साक्षीदारांची जबाब न्यायालयात झाले त्यामध्ये गावातील समद पठाण घटनास्थळ पंच व डॉ शुभांगी पैठणे तसेच तपाशी अंमलदार तथा एपीआय अजिनाथ भडके तसेचअशोक बबन बनसोडे आदी सात लोकांची साक्ष मा. न्यायालयात नोंदविण्यात आली वरील साक्षीदाराची साक्ष विश्वास पात्र वाटली नाही. आरोपीचे विद्वान फौजदारी वकील ॲड राकेश हंबर्डे यांनी न्यायालयात भक्कमपणे निर्भीडपणे साक्षीदारांचे उलट तपास व त्यानंतर अंतिम विवेचन केले व न्यायालयात प्रस्तुत खटला फिर्यादीने सबळ पुराव्याने सिद्ध केला नाही तसेच जखमी महिला अरुणा हिने तिला मारहाण झाले बाबत व उपचार घेतले बाबत न्यायालयास कळविले नाही तसेच आजूबाजूचे शेतकऱ्यांची जबाब नोंदविले नाही याउलट प्रकरणातील आरोपी याने फिर्यादी व इतर तीन साक्षिदार यांचे विरुद्ध कथित घटनेच्या अगोदर त्याच्या पत्नीचा मारहाण करून गर्भपात केले बाबत तक्रार दिली आहे व त्यास देखील नाकाचे हाड फ्रॅक्चर होईपर्यंत मारहाण झाल्याचे मे. कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले आहे त्यामुळे आरोपीचे विधीज्ञ ॲड राकेश हंबर्डे व त्यांना सहकार्य करणारे ॲड महादेव मोहिते यांनी उच्च न्यायालयाचे तसेच सर्वोच्च न्यायालयाचे वेगवेगळे न्यायनिवाडे कळवून संशयाचा फायदा आरोपीस मिळवून दिला त्यामुळे आरोपीची सदर प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली. दि ९ में २०२५ रोजी मा.न्यायाधीक्ष एम के पाटील यांनी न्यायनिर्णय दिला.विशेषता सदरचा गुन्हा नोंदविला म्हणून आरोपींनी तहसील कार्यालय आष्टी येथे कुटुंबियांसह आमरण उपोषण केले होते.
आरोपीची निर्दोष मुक्तता झाल्यामुळे कानडी खुर्द व पंचक्रोशीतील लोकांनी दोन्हीही विधीज्ञानाचे ॲड राकेश हंबर्डे व ॲड महादेव मोहिते यांचे प्रत्यक्ष पेढा भरून आभार मानले सदर प्रकरणाकडे कानडी खुर्द व पंचक्रोशीतील लोकांचे लक्ष लागले होते शेवटी सत्याचा विजय झालाच अशी जनमानसात चर्चा होती.
stay connected