मंदीराच्या बांधकामासाठी मदतीला सरसावले असलम सय्यद
अकलूज प्रतिनिधी -
जिथे माणूसकी जिवंत असते ------ तेथे धर्मांधतेच्या भिंती आपोआप गळून पडतात ,असाच प्रसंग अकलूज येथील राऊतनगर परिसरात दिसून आला.
येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक दोरकर यांनी मंदिर बांधायचे ठरवले,व आर्थिक मदतीचे आवाहन केले.याच परिसरात राहणारे अस्लम सय्यद यांनी मंदिर बांधकामासाठी बांधकाम साहित्य देऊन बांधकामासाठी मोठी मदत केली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिपक दोरकर यांनी समाधान व्यक्त केले.
अकलूज येथील राऊतनगर परिसरात हिंदू मुस्लिम बांधवाचे सण व उत्सव साजरे होतात व दोन्ही धर्मांतील बांधव एकमेकांच्या कार्यक्रमांत आनंदाने सहभागी होतात.
यावेळी युन्नूस तांबोळी (सर), सलीम खान पठाण आदि उपस्थित होते.
stay connected