पांढरी गावचे सरपंच सुधीर पठाडे राज्यस्तरीय आदर्श सरपंच सेवारत्न पुरस्काराने सन्मानित
*******************************
******************************
आष्टी (प्रतिनिधी)
सामाजिक क्षेत्रात गेल्या काही वर्षातील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी दखल घेऊन आणि दैनिक तुफान क्रांती परिवाराच्या वतीने आष्टी तालुक्यातील पांढरी गावचे युवा सरपंच सुधीर पठाडे यांच्या कार्याचा गौरव म्हणून तसेच प्रोत्साहन हेतूने 2025 चा राज्यस्तरीय आदर्श सरपंच सेवा रत्न पुरस्काराने महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद मुंबई प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, दैनिक तुफानचे
महाराष्ट्र राज्य विशेष प्रतिनिधी अनिरुद्ध गायकवाड यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
दैनिक तुफान क्रांती या वृत्तपत्र तसेच संपादक मिर्झा गालिब रजाक मुजावर, उपसंपादक जावेद अत्तार,कार्यकारी संपादक तनवीर मुजावर या वृत्तपत्र परिवाराकडून दरवर्षी दैनिक तुफान क्रांती वृत्तपत्राच्या वर्धापन दिना चे औचित साधून संपूर्ण महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आदर्श सेवा गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असते. यावर्षीच्या वर्धापनदिनी आष्टी तालुक्यातील पांढरी गावचे युवा सरपंच सुधीर वैजीनाथ पठाडे यांना गावामध्ये विविध विकासकामे केल्याबद्दल तसेच आदर्श सरपंच म्हणून सामाजिक राज्यस्तरीय सेवा रत्न पुरस्कार दैनिक तुफान क्रांतीने त्यांना पुरस्कार देऊन सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य मुंबई चे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, राज्य विशेष प्रतिनिधी अनिरुद्ध गायकवाड यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी समवेत आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण पोकळे व भाऊसाहेब वायसे उपस्थित होते. युवा सरपंच सुधीर पठाडे यांना सामाजिक क्षेत्रातील आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित केल्याने आमदार सुरेश धस, माजी जि. प. सदस्य देविदास धस, युवा नेते जयदत्त धस, श्याम धस,सागर धस यांच्यासह आष्टी तालुका सरपंच परिषद तसेच पांढरी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
stay connected