KALYAN | खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाहणी दौर्यात आमदार राजेश मोरे खड्ड्यात पडून जखमी
- डोंबिवलीत मानपाडा येथील तलाव सुशोभिकरणाच्या भूमिपूजन सोहळ्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आमदार राजेश मोरे यांच्या कार्याची स्तुती केली. मात्र, या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले. अंबरनाथ मधील क्रीडा संकुल परिसरात पाहणी दरम्यान गटारीवरून उडी मारताना आमदार मोरे खड्यात पडले आणि त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, त्यामुळेच ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
डोंबिवली जवळील मानपाडा येथे शिवसेनेच्या वतीने तलाव सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते, तर कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीमागचे कारण खुद्द खासदार शिंदे यांनीच आपल्या भाषणातून स्पष्ट केले.त्यांनी सांगितले की, "राजेश मोरे हे २४ तास कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध राहतात. मात्र, एका पाहणी दरम्यान उडी मारताना ते अपघातग्रस्त झाले आणि त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले. त्यामुळेच ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत."या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, आमदार मोरे कसे पडले याची चर्चा रंगली आहे. कार्यक्रमाला अंबरनाथमधील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


stay connected