पंगत चालू असताना उडाला सप्ताहचा मंडप : जिवीतहानी टळली

 पंगत चालू असताना उडाला सप्ताहचा मंडप : जिवीतहानी टळली




आष्टी तालुक्यातील कुंभारवाडी येथे श्री संत बाळुदेव महाराज यांच्या स्मृती पित्यर्थ अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे . हा सप्ताह दि . १२ फेब्रुवारी ला सुरू झाला असुन त्याची सांगता ही १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे . येथे दररोज विवीध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात . त्यासाठी मंदिरासमोर भव्य मंडप उभारण्यात आलेला होता या मंडपात दुपारची पंगत सुरू होती . दिडशे ते दोनशे भाविक या मंडपात जेवणाचा आस्वाद घेत होते . त्यात लहान मुले ' वृद्ध महिला ' पुरुष मोठ्या संखेने उपस्थित होते . मात्र आज रविवार दि . १६ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पंगत चालू असताना क्षणार्धात वावटळ येऊन मंडप 20 फुट उंच उडाला तसेच मंदीरा समोरील विद्युत पोल कोसळला व विजेच्या तारा लोखंडी मंडपाच्या पाईपां वर पडल्या . मंडप उडत असतांना काही ग्रामस्थ व तरुणांनी मंडपाच्या खांबांना ओढून धरण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्यात यशस्वी ठरले नाही मंडपाचे मोठे नुकसान झाले तर विजेचा खांब कोसळता क्षणी विद्युत पुरवठा खंडीत होऊन मोठी जिवीत हानी टळली . इतका भयानक प्रकार क्षणार्धात घडला . सर्वत्र धावपळ उडाली मात्र सुदैवाने एकाही भाविकाला इजा झाली नसल्याने कुंभारवाडी ग्रामस्थ बाळू देव महाराज चरणी नतमस्तक झाले . ईश्वरी कृपेने या संकटातून सर्व भाविक सुखरूप वाचले तर बाळुदेव महाराजांची प्रतिमा असलेल्या रथाला व शिवरायांच्या प्रतिमेला धक्काही लागला नाही . त्यानंतर ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू करून मंडप खोलण्याचे कार्य केले . पुर्ववत मंडप बांधणी करून उर्वरीत सप्ताह कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी कुंभारवाडी ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत .

तेजवार्ता



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.