कड्यात शिवजन्मोत्सवानिमित्त रयतेच्या 'राजाला' शिवभक्तांकडून अभिवादन

 'जय शिवाजी.. जय भवानी'... च्या, 
जय घोषणांनी शहर अक्षरश: दुमदुमले

----------------------

कड्यात शिवजन्मोत्सवानिमित्त रयतेच्या 'राजाला' शिवभक्तांकडून अभिवादन










------------

राजेंद्र जैन / कडा 

-------------------

Advertise 👇 



छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कडा शहरात अभूतपुर्व उत्साह अन् जल्लोषपूर्ण शिवमय वातावरणात बुधवारी साजरी करण्यात आली. 'जय शिवाजी.. जय भवानी'...च्या जयघोष करीत शहर अक्षरश: दुमदुमले होते. रस्त्यांच्या बाजूला भगवे झेेंडे, विधूत रोषणाई, आकर्षक कमानी उभारण्यात आल्या होत्या. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्यास शिवभक्तांकडून पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर सायंकाळी विविध पथकांसह शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मुर्तीची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली.



शिवजन्मोत्सवानिमित्त कडा शहरात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ सुरेख मूर्तीचे पूजन करुन शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत शिवकालीन मर्दानी खेळ, केरळ येथील चेंडा वाद्य, महाकाल डमरू पथक उज्जैन, बाहुबली हनुमान, महिला लेझीम पथक कोल्हापूर, सनई पथक, मावळे पथक, मोटू-पतलू जोकर, हलगी पथक, घोडे, बॅण्ड पथक, निळकंठेश्वर महादेवांचा देखावा, शिवकालीन मावळ्यांच्या वेषभूषेत शालेय विद्यार्थी, शिवप्रेमी नागरिक जय शिवाजी.. जय भवानी'...च्या जयघोष करीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कड्यात चौकाचौकात विधूत रोषणाईसह फटाक्यांची आतिषबाजी करीत मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. या शोभायात्रेत अवघी शिवशाही अवतरल्याचे नयनमय दृक्ष्य कडेकरांनी यानिमित्त अनुभवले म्हणावे लागेल.

--------%%--------




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.