🚩पठारे गोंदकर विवाह शाही थाटात संपन्न
सत्काराच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन
जिजाऊ विद्यार्थी वस्तीगृहास आर्थिक मदत
आष्टी (Reporter)
आष्टी तालुक्यातील बाळेवाडी येथील इंजि.दत्तात्रय पठारे यांची कन्या इंजि.प्रतीक्षा व केरूळ तालुका आष्टी येथील
बबन दत्तात्रय गोंदकर यांचा मुलगा इंजि.अनिकेत यांचा शुभविवाह श्रेया गार्डन केडगाव अहिल्यानगर येथे शाही थाटात संपन्न झाला. या शुभविवाहसाठी आष्टीचे आमदार सुरेश आण्णा धस, माजी आमदार साहेबराव नाना दरेकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि.तानाजी बापू जंजिरे, उद्धव बापू दरेकर, माजी सभापती अंकुश चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी येणाऱ्या मान्यवरांचा शब्दसुमनाने सत्कार करण्यात आला व खर्चिक अशा सत्काराला फाटा देऊन आष्टी येथील मराठा सेवा संघाच्या जिजाऊ विद्यार्थी वस्तीगृह बांधकामास ₹ 25000/- ची आर्थिक मदत देण्यात आली. या निर्णयाचे सर्व वऱ्हाडी मंडळींनी स्वागत केले.


stay connected