आष्टी येथे दातांच्या मोफत तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद

 आष्टी येथे दातांच्या मोफत तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद 

  


                                       

आष्टी प्रतिनिधी                                        

आष्टी जि.बीड येथील डॉ.सय्यद डेंटल क्लिनिक आयोजित दिनांक 15 आणि 16 फेब्रुवारी 2025 या दोन दिवशीय दातांच्या मोफत तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला असून अनेक दंत रुग्णांनी याचा लाभ घेतला.डॉ.सय्यद डेंटल क्लिनिकचे डॉ.सय्यद हुमायुद्दीन यांनी त्यांचे वडील,महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन केले होते.मोफत तपासणी शिबिराचे हे दुसरे वर्ष आहे.या शिबिराचा शुभारंभ डॉ.मधुकरराव हंबर्डे,सुखलालजी मुथा, वाहेद खान पठाण,अशोक देवा,हाजी हारून शेठ,चंद्रभान देशमुख,हाजी सय्यद हबीब हुसेन यांच्या उपस्थितीत करण्यात आला.तसेच मौजे चिंचाळा या जन्मगावी 14 फेब्रुवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांना टूथपेस्ट,टूथब्रश,बिस्किटे यांचे वाटप करण्यात आले.यावेळी सरपंच पंडित कल्याण पोकळे, मुख्याध्यापिका हेमलता तरटे,पो.पा.गणपत पोकळे,जालिंदर पोकळे,महादेव पोकळे,शाळा समिती अध्यक्ष,मा.सरपंच दिगंबर पोकळे,मा.सरपंच अशोक पोकळे,शिक्षक,शिक्षिका आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.