शासनाच्या योजनेमध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार करणाऱ्याची हुकुमशाही मोडीत काढा - माजी आ.भीमराव धोंडे
आष्टी (प्रतिनिधी) - आष्टी, पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघातील हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी " शिट्टी " निवडुन द्यावी.शेततळे व घरकुलासाठी पैसे घेतात हे थांबले पाहिजे,जलजिवन योजना व्यवस्थित राबविली गेली नाही त्यामुळे शासनाच्या पैशाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला आहे. आमदार बाळासाहेब आजबे यांनी आष्टीसाठी निधी आणला होता परंतु नगर पंचायतीने त्यांना एन.ओ.सी. दिले नाही.हे लोकशाहीचे लक्षण नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महेबुबभाई शेख यांची उमेदवारी हा एक प्रकारचा डाव आहे. त्यामुळे मुस्लिम बंधूंनो आपले मत वाया घालवू नका असे सांगत शेततळे,घरकुलात टक्केवारी खाणारे,जलजीवन योजना बोगस करुन कोट्यावधीचा भ्रष्टाचार करणाऱ्याची हुकुमशाही मोडीत काढावी असे आवाहन अपक्ष उमेदवार व माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले.
आष्टी व मुर्शदपुर येथील बुथ प्रमुखांच्या बैठकीत केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच संतोषभैय्या चव्हाण हे होते.
अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ मुर्शदपुर व आष्टी शहरात सुमारे तीन तास प्रचार फेरी काढून संपुर्ण आष्टीशहर,विनायकनगर आणि मुर्शदपुर शिट्टीच्या आवाजाने दणाणून गेले.लिमटाका गणपतीचे दर्शन घेऊन माजी आ.भीमराव धोंडे यांच्या फेरीस प्रारंभ झाला, प्रचार रॅलीमध्ये माजी सभापती साहेबराव म्हस्के,अभयराजे धोंडे,नियामत बेग, माजी सरपंच संतोषभैय्या चव्हाण,महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे,ॲड. रत्नदीप निकाळजे, नगरसेवक आस्लम बेग,बाबु कदम,सदा पाटील दिंडे,विठ्ठलराव बन्सोडे,दिलीप काळे,उत्तम बोडखे,चेअरमन अरुण सायकड,बब्बर खाॕन,शेख अफसर, मतीन शेख,रेहान बेग,अस्ताक शेख, सय्यद रिजवान,बाबा गर्जे, कुंडलीक आस्वर,संदीप पगारे, सय्यद निसार,ईब्राहम खान,हादि शेख,लड्डुभाई पठाण,शेख फजल,शेख आदि,माजेद खाॕन गौतम ससाणे, बाबा ससाणे,आदेश निमोणकर यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि युवक सहभागी झालेले होते.
माजी आमदार भीमराव धोंडे, युवराज अभयराजे धोंडे व इतर कार्यकर्ते मतदार आणि व्यापाऱ्यांना भेटून शिट्टी चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन करीत होते.
पुढे बोलताना माजी आ. भीमराव धोंडे यांनी सांगितले की,
सतिश शिंदे, आण्णासाहेब चौधरी यांचा व्यावसाय बंद पाडण्याचे काम काही लोकांनी केले. मतदारसंघातील सर्वसामान्य जनता आणि व्यापारी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे काळजी करु नका.माजी सभापती साहेबराव म्हस्के यांनी सांगितले की,आपला विजय निश्चित आहे फक्त गाफिल रहायचे नाही. फक्त शिट्टी वाजवून जमणार नाही तर प्रत्येक मतदारांकडे कार्यकर्त्यांनी गेले पाहिजे,विरोधकांनी रस्ते खाल्ले, पाणी योजना खाल्ल्या कसलाही विकास केला नाही. कोणीही घाबरण्याचे कारण नाही. सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन चालणारे नेतृत्व म्हणजे भीमराव धोंडे होय.
यावेळी माजी सरपंच संतोष चव्हाण यांनी सांगितले की, भीमराव धोंडे आमदार असताना मतदारसंघ कसा शांत असतो. काही लोकं माणसात माणसं ठेवत नाहीत.मतदारसंघाला शांततेसाठी आणि विकासासाठी भीमराव धोंडे यांची गरज आहे. इतिहास लिहिला तर आपले नांव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल.ॲड.रत्नदिप निकाळजे यांनी सांगितले की, आष्टी विधानसभा मतदारसंघाची शिट्टी विधिमंडळात जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.माजी सभापती नियामत बेग यांनी सांगितले की,कार्यकर्त्यांनी शिटृटी वाजवुन शेवटपर्यंत जागरुक रहावे.रिपाइंचे अध्यक्ष अशोक साळवे यांनी सांगितले की,भीमराव धोंडे हे निश्चित विजयी होणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिलीपराव काळे यांनी केले.याप्रसंगी संदीप पगारे, बाबुराव कदम व इतरांची भाषणे झाली.कार्यक्रमास ॲड.मोहन खेडकर,निसार सय्यद,रेहान बेग, निसार शेख,बाबा गर्जे, गौतम ससाणे,बाबासाहेब ससाणे,मतीन भाई,संदीप पगारे,आण्णासाहेब लांबडे,तौकीक बेग,कुंडलिक आस्वर,इम्राण खान,बब्बर खान, लड्डूभाई पठाण यांच्यासह बुथ प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रॅलीच्या निमित्ताने व्यापारी आणि ग्रामस्थांनी ठिकठिकाणी माजी आ.भीमराव धोंडे यांचे फेटा बांधून स्वागत केले. रॅलीचा समारोप महात्मा गांधी विद्यालयात करण्यात आला.संचलन दिलीप काळे व आभार नगरसेवक अस्लम बेग यांनी मानले.




stay connected