वनविभागाच्या दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या नील गाईला जीवदान

 वनविभागाच्या दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या नील गाईला जीवदान 






आष्टी प्रतिनिधी:-आष्टी तालुक्यातील सहा परस विहिरीत पडलेल्या नील गाईला वाचविण्यात वन विभागाला यश आले सदर गाईला सुखरूप बाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या टीमने केलेल्या तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर नील गाईला सुखरूप बाहेर काढण्यात अखेर यश आले 



आष्टी तालुक्यातील खरकटवाडी परिसरात वनक्षेत्रालगत असलेल्या शेतातील विहिरीला संरक्षक कठडे नसल्याने नील गाय सहा परस खोल विहिरीत पडली या घटनेची माहिती मिळतात वनविभागाचे अधिकारी तात्काळ आले त्यांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागाच्या टीमला नील गाईला वाचविण्यात यश आले यात वनविभागाचे वन परिक्षक अधिकारी ढगे साहेब वन पाल कडा तागड साहेब ,वनरक्षक काळे साहेब, पडलकर साहेब , वनकर्मचारी बन्सी तांदळे,कानिफ पवार गोरख पवार , जयसिंग मोहिते , अशोक पाथरकर, दत्तात्रय भुकण, इन्नुस शेख ज्ञानेश्वर मोहिते आदी होते



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.