ऊसतोड कामगार, गोरगरीब व शोषितांसाठी माझी उमेदवारीः कैलास भाऊ जोगदंड
आष्टी। प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे व राष्ट्रीय महासचिव मोहन पाटील यांच्या आदेशाने २३१ आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातून रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश संघटक कैलास जोगदंड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यासाठी आष्टी तालुका कमिटी व तालुकातील कार्यकर्ते उपस्थित होते पुढील काळात आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत आष्टी तालुक्यातील पंचायत समितीमध्ये घरकुल व योजना आणि तसेच भरपूर योजनातून केला जाणारा भ्रष्टाचार यांना वाचा फोडण्यासाठी गोरगरिबाच्या जमिनीत लुटणाऱ्या व शोषित पीडित वंचित महिलांवर अन्याय करणाऱ्या आणि भारतीय संविधान वाचवण्यासाठी जातीवादी व आंबेडकरी द्वेषी लोकांना रोखण्याकरता एक दलित बहुजनांचा उमेदवार मतदार संघामध्ये असावा एकंदरच मतदारसंघांमध्ये भांडवलदारांचा व सत्ताधाऱ्यांचा कारभार सुरू आहे दलित सुरक्षित नाही सातत्याने बहुजन समाजावर आणि अत्याचार केले जात आहे
सावकारांची दादागिरी वाढलेली आहे एकंदरच आष्टी पाटोदा शिरूर या ठिकाणी मजूर कामगार भरपूर आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी कोणी आवाज उठवत नाही त्यांची पिळवणूक सातत्याने होत आहे त्यांच्या नावाचं जे महामंडळ आहे ते फक्त नावापुरते आहे त्या महामंडळाच्या नावावरती आमदार खासदार चेअरमन आपली पोटे भरत आहे त्यामुळे त्यांना जाब विचारण्याकरता तुमच्या सर्वांचा हक्काचा माणूस म्हणून ज्याला गरिबीची जाण आहे तसेच शून्यातून विश्व निर्माण
करून लढण्याची ताकद डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून दिलेले आहे अशा कैलास भाऊ ची उमेदवारी म्हणजेच सर्वसामान्यांची उमेदवारी आहे गोरगरिबाच्या हिताची उमेदवारी आहे शोषित वंचित महिला यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला प्रतिकारक आणि जाब विचारधाराची उमेदवारी आहे त्यामुळे कैलास भाऊची हात बळकट करून येणाऱ्या काळामध्ये आपल्या विचाराचा आमदार विधानसभेमध्ये पाठवून जातीवाद्यांना जाब विचारण्याचे धैर्य सर्वसामान्यांनी करावे तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न वाढलेला आहे दीड हजार रुपये देऊन आपली लाडकी बहीण म्हटलं जातं परंतु बहिणीच्या दाजीच्या खिशातून दिवाळीच्या नावावरती तेलातून उठण्यातून बेसन पिठातून पैसे खाणारे शासन आता तयार झालेली आहे त्यामुळे यांना जाब विचारणे गरजेचे आहे आणि यांना जाब विचारणारा गरीब आणि गरिबीतून आलेला उमेदवार म्हणजेच कैलास भाऊ जोगदंड यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
stay connected