मतदारसंघात "एक गाव एक गोठा" ही संकल्पना भविष्यात राबवा ---- माजीमंत्री Suresh Dhas

 मतदारसंघात "एक गाव एक गोठा" ही संकल्पना भविष्यात राबवा
---- माजीमंत्री सुरेश धस 

*******************************




कडा येथे आष्टी तालुका दूध संघाच्यावतीने दूध उत्पादक शेतकरी महिला मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद

*********************************


**********************************

आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी तालुका हा पूर्णपणे दुग्ध व्यवसायावर अवलंबून असून या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुधाचे उत्पन्न घेतले जाते मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये हे गाव एक गोठा ही संकल्पना जर राबविली तर शेतकरी वर्गात नक्कीच भरभराट होणार असून मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश धस यांनी केले.

आष्टी तालुक्यातील कडा येथील आष्टी तालुका दूध संघाच्यावतीने दूध उत्पादक शेतकरी महिलाच्या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन शांतीलाल भोसले, व्हा.चेअरमन छायाताई अशोक गर्जे,आत्माराम फुंदे,सरपंच अशोक भवर,कार्यकारी संचालक मच्छिंद्र धनवडे, चेअरमन शिवाजी कोकणे,अनुजा गळगटे, अनिता पोकळे, सुनिता गिरी, छाया धस,भरत सुळे,व्यवस्थापक दिनकर दाणी आदी उपस्थित होते.

    कडा येथे आष्टी तालुका दूध उत्पादक व पुरवठा सहकारी संघ मर्यादित आष्टी यांच्या वतीने दूध उत्पादक महिलांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास दूध उत्पादक शेतकरी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला तर यावेळी माजी आमदार सुरेश धस यांनी उपस्थित राहून दूध उत्पादक महिलांशी संवाद साधला.

यावेळी पुढे बोलताना माजीमंत्री धस म्हणाले की,

दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी मी विधिमंडळात वेळोवेळी शेतकऱ्यांची बाजू मांडून धरली. यामुळे सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ७ रुपये प्रतिलिटर अनुदान दिले.दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान,मुक्त संचार गायगोठा पद्धतीने दुध व्यवसायात होणारी वाढ,दिवसेंदिवस शेतकरी विविध प्रजातीचे सिमेन्स वापरून सदृढ कालवडी बनवत आहेत,आज शेतकरी हुशार झाला आहे. पंजाब हरियाणा येथे जाऊन कालवडी खरेदी करत छोट्या व्यवसायाला मोठ्या स्वरूपात करण्यासाठी धडपडत आहेत.दुष्काळी परिस्थितीत मी आष्टी दुध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मुरघास बॅगची सुरवात केली त्याच फलित म्हणून आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारात मुरघास बॅग दिसत आहेत, दुध व्यवसाय करत असताना गायींचा विमा संरक्षण करणे हे महत्वाचे आहे,अनेकदा अचानकपणे दुध दर कमी जास्त झाल्याने अनेकदा उत्पादक अडचणीत सापडलेला आहे,तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दुग्धविकास मंत्री यांच्याशी राज्यातील प्रमुख सहकारी व खाजगी दुध संघाचे संचालक यांच्यासोबत वेळोवेळी सरकारला विनंती करत दुधाला अनुदान मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे, दुष्काळी परिस्थिती चारा छावण्याच्या माध्यमातून मतदार संघातील  पशुधन वाचवण्यासाठी राज्यातील ईतर भागातुन चारा उपलब्ध करून छावण्या चालवल्या त्यामुळेच आज आपला दुध व्यवसाय कायम आहे. कोरोनाच्या काळात दुध व्यावसाय अस्थिर झाल्याचे चित्र दिसत होते परंतु तालुका दुध संघ उत्पादकांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहिल्याने हा व्यवसाय टिकून आहे,जेव्हा लंम्पि आजाराने अनेक शेतकऱ्यांच्या दुग्धजन्य गाई व पशुधन यांची काळजी म्हणून वेळोवेळी लसीकरण केले,वेळोवेळी आपण लसीकरण करण्यासाठी दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये जाऊन आपण लसीकरण मोहीम राबवतो म्हणून दुध उत्पादकांचे तालुका संघावर असलेले प्रेम कायम आहे.

     या दुध व्यवसायात वेळ, प्रयत्न व पराकाष्ठा महत्वाची आहे, दोन वेळेचे संकलन होणे गरजेचे आहे,ज्यामुळे शेतकऱ्यांना आधिकच फायदा होतो, या सर्व कामात प्रत्येक कुटुंबातील महिला या दुध व्यवसायात अग्रेसर असल्याने यामध्ये महिलांचे योगदान विसरून चालणार नाही,यामुळे पुरुषासोबत दिवसरात्र राबणारी महिला ही दुध व्यवसायत महत्वाची बाब आहे..


यावेळी आष्टी तालुका दुध संघाच्या संचालिका प्राजक्ताताई धस म्हणाल्या  की ,आष्टी तालुका दूध संघामार्फत  अनेक योजना राबवित आहेत त्यापैकीच मुरघास ही संकल्पना सुरेश धस यांनी गेल्या पाच वर्षांपूर्वी राबवली होती. ही संकल्पना मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरल्याने शेतकऱ्यांना चाऱ्याची अडचण निर्माण होत नाही तसेच मुरघासामुळे दुधाची गुणप्रत व दुधाचे उत्पन्न ही वाढण्यास मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे .आष्टी तालुका दूध संघाने कोरोना काळामध्ये हजारो लोकांना जीवदान देण्यासाठी कोविड सेंटर उघडले होते. सध्या ऑक्टोबर एंड पर्यंत साधारणपणे सहा कोटी रुपयांचे दूध अनुदान वितरित होणार आहे मराठवाड्यातील आष्टी हा सर्वात मोठा दूध संघ असून सर्वसामान्य लोकांना व दूध उत्पादकांना न्याय देण्याची भूमिका नेहमीच आष्टी तालुका दूध संघाने घेतल्याचे प्राजक्ताताई धस यांनी सांगितले.

यावेळी अर्चना शिर्के, अनुजा गळगटे, छाया धस, अर्चना शिर्के, अनिकेत वनवे यांनी मनोगत व्यक्त केली.

यावेळी दूध अनुदानाला वेळोवेळी पाठपुरावा करून माजीमंत्री सुरेश धस यांनी अगोदर ५ रुपये आणि आत्ता ७ रुपये असे अनुदान मिळवून दिल्याबद्दल संस्था चालक चेअरमनच्यावतीने बाळासाहेब कर्डिले,गोरख कर्डिले ,उद्धव कर्डिले,बाळासाहेब सांगळे, सुभाष कर्डिले, नागेश्वर कर्डीले आदींनी सत्कार करून आभार व्यक्त केले



.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.