*उदगीरच्या शिवलिंग मठपती यांना सदाविजय आर्य कार्यकर्ता पुरस्कार*
सोलापूरला होणार पुरस्काराचे वितरण
पुणे
आंतरभारतीचे दिवंगत माजी अध्यक्ष प्राचार्य सदाविजय आर्य यांच्या नावाने दिला जाणारा 2024 साठीचा 'कार्यकर्ता पुरस्कार' उदगीरच्या शिवलिंग मठपती यांना जाहीर करण्यात आला आहे.
मागच्या वर्षी पहिला पुरस्कार पुण्याच्या राम माने यांना देण्यात आला होता.
शिवलिंग मठपती हे उदगीर येथे आंतरभारती शाखेचे सचिव म्हणून काम करतात. आंतरभारतीच्या भारत दर्शन यात्रेत उदगीरच्या लोकांचा मोठा सहभाग असतो, तो मिळवण्यात शिवलिंग मठपती यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. आंतरभारती परिवारात स्नेहभाव वाढावा यासाठी ते अनेक उपक्रम चालवतात. त्यांनी उदगीर येथे बालआनंद मेळाव्याचे सफलतापूर्वक आयोजन केले होते. शिवलिंग मठपती यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील एका तालुक्याच्या ठिकाणी उभे केलेले कार्य वाखाणण्याजोगे असल्यामुळे त्यांना वर्ष 2024 साठी 'प्राचार्य सदाविजय आर्य कार्यकर्ता पुरस्कार' जाहीर केला आहे, अशी माहिती आंतरभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी व सचिव डॉ डी एस कोरे यांनी दिली.
*सोलापुरात वितरण*
25 डिसेंबर 24 रोजी सोलापूर येथे होणाऱ्या आंतरभारतीच्या 'स्नेहमीलन' सोहळ्यात पुरस्काराचे सन्मानपूर्वक वितरण केले जाईल. आंतरभारतीच्या वतीने दरवर्षी आंतरभारती परिवाराचा 'स्नेहमीलन' मेळावा घेतला जातो, त्यात राज्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहतात. यंदा हा मेळावा सोलापूर येथे होणार आहे.
stay connected