मतदारसंघातील दहशतीचे वातावरण मोडून काढण्यासाठी सहकार्य करा कर्हेवडगाव येथील भव्य स्वागताने माजी आ. भीमराव धोंडे यांचा मतदारसंघाचा दौरा पुर्ण

 मतदारसंघातील दहशतीचे वातावरण मोडून काढण्यासाठी सहकार्य करा
कर्हेवडगाव येथील भव्य स्वागताने माजी आ. भीमराव धोंडे यांचा मतदारसंघाचा दौरा पुर्ण 




आष्टी ( प्रतिनिधी )


 आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने माजी आ. भीमराव धोंडे यांनी सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या मतदारसंघातील जनसंपर्क अभियानाचा पहिल्या टप्प्याचा दौरा पुर्ण केला असुन आष्टी तालुक्यातील कर्हेवडगाव येथील ग्रामस्थांनी जेसीबीतून फुले उधळत रथातून मिरवणूक काढून डी. जे. लावुन भव्य स्वागत करीत संवाद दौरा पुर्ण केला. 

मतदारसंघातील दहशतीचे वातावरण मोडून काढण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले. तवलवाडी येथे माजी सरपंच राहुल जगताप, उमेश जगताप व इतरांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांचे जोरदार स्वागत केले. 

आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी  माजी आ. भीमराव धोंडे यांनी सोमवारी दिनांक १४ आक्टोबर रोजी जनसंपर्क अभियाना अंतर्गत आष्टी तालुक्यातील बीडसांगवी,

देसूर, शेकापुर,चिंचाळा, पिंप्री आष्टी,इमनगाव,हनुमंतगाव,

मंगरूळ,तवलवाडी,सोलेवाडी,

पांढरी,पोखरी,कर्हेवडगाव या गावांचा दौरा केला.

सोलेवाडी येथे ग्रामस्थांनी माजी आ. भीमराव धोंडे यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून स्वागत केले तर पोखरी  येथील ग्रामस्थांनी रथातून मिरवणूक काढली इतर गावांतही ग्रामस्थांनी तोफा वाजवून  स्वागत केले. 

       वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भाषणात माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, मागच्या वेळी माझी  फसवणूक झाल्याने  

थोड्या मताने पराभव झाला. मतदारसंघात माझा कोणाशी वाद नाही, कोणाशी माझे भांडणे झाले  नाही , कोणत्याही कामात कधी कमिशन घेतले नाही. माझ्या काळात मी कामाबाबत कधी भेदभाव केला नाही. मी सत्तेत नसताना मात्र आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. उद्याच्या निवडणुकीत मतदारसंघाच्या विकासासाठी मला सहकार्य करा. आष्टी तालुक्यात  कांदा उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उन्नती होत आहे. बीड सांगवी  परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत.  २०१४ ते २०१९ या काळात पोलिस स्टेशनला गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे पोलिस ठाण्यास पुरस्कार मिळाला होता. ग्रामीण भागातील मुलांनी चांगले शिक्षण घ्या, निश्चित प्रगती होईल. शिक्षणाने निश्चित बदल होईल हे लक्षात ठेवा. तुमच्या मुलांच्या शिक्षणाची गावागावात सोय केली आहे. उद्याच्या निवडणूकीत

लोकांच्या कल्याणासाठी मला सहकार्य करा असेही माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले.

      भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे यांनी सांगितले की, माजी आमदार भिमराव धोंडे यांनी मतदारसंघात विकासाची गंगा आणली. सध्याच्या काळात पंचायत समिती मध्ये काय चालले आहे हे सर्वांना माहीत आहे, अधिकारी मनमानी करतात. गोरगरिबांना त्रास देण्याचे काम सुरू आहे.धोंडे साहेब  लोकांच्या आग्रहास्तव निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गावागावात दौऱ्याच्या निमित्ताने ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‌साहेब म्हणजे युवकांसाठी प्रेरणादायी असे व्यक्तीमत्व आहेत, पक्ष कोणताही असो चिन्ह कोणतेही असो साहेब उमेदवार असतील हे निश्चित आहे. विठ्ठलराव भगत यांनी सांगितले की माजी आ.  भिमराव धोंडे यांच्या काळात मतदारसंघात शांतता असते. ते कधी  पोलीस स्टेशनला फोन करीत नाहीत. कधी गावागावात आणि माणसांत वाद लावण्याचे काम करीत नाहीत. बीड सांगवी येथील लेखक लक्ष्मण दिवटे यांचा माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विविध ठिकाणी भाजपा तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे,माजी सरपंच राहुल जगताप,भाजपाचे आष्टी शहराध्यक्ष बाबुराव कदम, भगत फौजी, ॲड. रत्नदिप निकाळजे,सरपंच सुधीर पठाडे,अहमद पठाण,सदाशिव दिंडे,त्रिंबक माने, चेअरमन उत्तम झगडे, प्रमोद भोगाडे, नवनाथ भगत, सरपंच पंडीत पोकळे, पै. ज्ञानेश्वर पोकळे, रामभाऊ झगडे, राम प्रभू  सोले, गणेश दिंडे व इतरांची भाषणे झाली. दौऱ्याच्या निमित्ताने अभयराजे धोंडे, घनश्याम नरवडे, उमेश जगताप,अज्जुभाई, पंडीत करांडे,महादेव दिवटे, सरपंच पंडीत पोकळे, दत्तात्रय पोकळे, पिंटू ढोबळे, प्रशांत घुमरे, सरपंच अशोक भवर,शहादेव फुंदे, कारभारी गर्जे, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, संजय केदार, विष्णू फुंदे, उपसरपंच गणेश गर्जे, विठ्ठल गर्जे, आस्ताक शेख, हादी शेख, नवनाथ साळुंखे, शिवाजी साळुंखे, कृष्णा पोकळे,सागर पोकळे, सुळे मामा, कोंडे मुकादम, माजी सरपंच महादेव कोंडे,  पंढरीनाथ गाडे, संतोष साठे, वसंतराव केरुळकर,

भाऊसाहेब शेळके, रमेश भोगाडे, 

ग्रा.पं. सदस्य आदेश निमोणकर, अरुण जासूद, सुरेश गाडे, गोविंद काळे, बाळासाहेब काकडे, रोहित काकडे, ऋषिकेश करडूळे, शिवाजी पारखे, भाऊसाहेब राऊत, दगडू पाटील, सुधीर पारखे, , उपसरपंच आबा तावरे, नवनाथ नवसुपे, मल्हारी दिंडे, अर्जून सापते, संदीप दिंडे, रमेश गोरे, संजय काकडे, गणेश दिंडे, काशिनाथ कोकणे, उध्दव कोंडे, बाळू माने, राजु तवले, जगदिश शिंदे, गौतम ससाणे, बबनराव तवले, गणेश झगडे, पिंटू झगडे, सतिश ढगे, सुनिल झगडे, उमेश शिंदे, विजय झगडे, वनवे मुकादम, सुधाकर डोके,गणेश नागरे, माजी सरपंच जालिंदर गायकवाड, ॲड. विधाते, आजिनाथ सांगळे, भरत सोले, पोपट सोले, संतोष जाधव व इतर उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.