सुनील चव्हाण यांच्यावरील पुस्तकाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रकाशन
संभाजीनगर प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील आष्टी येथील सुपुत्र, औरंगाबाद तथा छ.संभाजीनगर येथील माजी जिल्हाधिकारी सुनील साहेबराव चव्हाण यांच्या जिल्हाधिकारी पदावर असताना केलेल्या कार्याचा आढावा घेणारा गौतम कोतवाल लिखित जनमानसातील जिल्हाधिकारी एक कर्मयोगी या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात दिनांक 5 ऑक्टोबर रोजी संपन्न झाले. नामदार अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या प्रकाशन सोहळ्यात विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,पुस्तकाचे लेखक गौतम कोतवाल,बंधू माजी सरपंच संतोष चव्हाण,वर्गमित्र कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्यासह अनेक मान्यवरांनी सुनील चव्हाण यांच्या विषयीचे गौरवपूर्ण अनुभव व्यक्त केले. सुनील चव्हाण यांनीही आपल्या जिल्हाधिकारी पदावरील कार्यकाळाचे अनुभव कथन करून पुस्तकाचे लेखक गौतम कोतवाल यांचे ऋण व्यक्त केले.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील, मंत्रालयातील अनेक अधिकारी, कर्मचारी, चव्हाण कुटुंबातील सर्व नातेवाईक, मित्र परिवारातील अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected