कडा येथील ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीची काँग्रेस ची मागणी

  कडा येथील ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीची काँग्रेस ची मागणी




कडा ता. आष्टी जि.बीड येथे गेल्या एक दिड महिण्यापासुन सबस्टेशन ३३ के.व्ही. मधील ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे पुढील गावांचा विज पुरवठा खंडीत झाला आहे. देविनिमगांव, केरूळ, डोंगरगण, शेरी खुर्द, शेरी बु ।। कडा ग्रामिण, चाोभानिमागांव, खाकाळवाडी, मोरेवाडी, लिंबोडी शेलारवाडी नांदा या १० ते १२ गांवाचा समावेश असून त्यामुळे मुलांचे अभ्यासाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तसेच पिण्याचा पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. विजपुरवठा खंडीत असल्यामुळे जनजिवन विस्कळीत झालेले आहे. तसेच शेतकऱ्यांची सध्या कांदा, मका पेरणी केलेली आहे व कापुस व तुर या पिकांना पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. वरील ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे कधी टाकळी अमियॉ सबस्टेशनला लाईट जोडली जाते तर कधी धामणगांव सबस्टशेनला लाईट जोडली जाते त्यामुळे सदरील परिसरातील शेतकाऱ्यांना सुध्दा लाईट कमी दाबाने मिळते त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोटरा चालत नाहीत. व शेतीला पाणी पुरवठा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात असे आर्थीक नुकसान होत आहे.


याबाबत कॉग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष रविंद्र काका ढोबळे यांनी निवेदन दिले  . तात्काळ सबस्टेशन कडा येथील ट्रान्सफार्मर बसविण्यात यावे . ट्रान्सफारर्मर आठ दिवसामध्ये बसविला नाही तर आठ दिवसानंतर आष्टी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कडा येथील आंबेडकर चौकात रस्ता रोको अंदोलन केले जाईल अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.