संत सहवासाने ब्रम्हज्ञान प्राप्त होते - ह.भ.प.राऊतदादा महाराज
----------------------------------------
----------------------------------------
आष्टी ( प्रतिनिधी)
देहाचं सार्थक करण्याकरीता जीवनामध्ये भक्तीची आवश्यकता आहे. भक्ती केल्यावाचून आणि साधु संतांची सेवा केल्यावाचून समाधान,सुख,शांती प्राप्त होत नाही.अमूल्य किंमतीचा हा नरदेह कोटी रुपये खर्च करूनसुद्धा पुन्हा प्राप्त होत नाही.जमीन,गेलेले धन, हे पुन्हा मिळवता येते पण एकदा शरीर गेलं की पुन्हा शरीर मिळत नाही म्हणून या शरीराकडून भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे.अनंत जन्माच्या पुण्याईने हा देह आपल्याला प्राप्त होतो.काहींना नरदेह मिळाला नाही त्याचे महत्त्वही कळालेले नाही,काहींना नरदेह मिळाला त्याचं महत्त्वही कळालं.काहींना नरदेह मिळाला नाही परंतु त्याचे महत्त्व कळालं आणि आपण संसारी जीव असे आहोत आपल्याला नरदेह प्राप्त झाला.मिळाला परंतु नरदेहाचं महत्त्व आपल्याला कळलेलं नाही म्हणून नको त्या विषयाकडे जीवाची धाव आहे. साधुसंतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर या जीवाला मी कोण आहे ? मी कुठून आलोय? मला कोठे जायचे ? याची जाणीव संत करून देत असतात.
संत सहवासाशिवाय खरे ज्ञान मिळत नाही.संत सहवासाने ब्रम्हज्ञान प्राप्त होते असे प्रतिपादन धर्मभूषण ह.भ.प. राऊतदादा महाराज (पिंपळा) यांनी केले.
आष्टी तालुक्यातील कडा येथील दैनिक झुंजारनेताचे पत्रकार दिगंबर बोडखे यांच्या सौभाग्यवती स्व.सौ.रत्ना बोडखे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने कडा येथील आनंद काॅलनीत आयोजित कीर्तनात बोलत होते.
ह.भ.प.राऊतदादा पुढे बोलताना म्हणाले की,आजच्या युगात संगणक न येणाऱ्याला ज्ञान नाही असे समजले जाते.प्रत्येकाला व्यवहारिक ज्ञानसुद्धा असले पाहिजे.माणसाच्या जीवनात आवश्यक असणाऱ्या बाबी व्यवहारातून मिळतात.संत सहवासाशिवाय खरं ज्ञान मिळत नाही.परमार्थामध्येच ज्ञान मिळते.
आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते इतरांना देण्याची मनमोकळेपणाने भावना असावी यालाच आपण त्याग म्हणतो. आपल्या शिष्याला शिष्य न समजता पांडुरंग समजावे. देवाची भक्ती केल्याने देव आणि भावसुद्धा कळतो.पत्नी विरहाचे दुःख खूप मोठे असते.सुखाचा संसार चालवण्यासाठी प्रत्येक घरात महिला असणे आवश्यक आहे. कोणत्याच महात्म्याला प्रारब्ध चुकले नाही तर तुम्ही आम्ही कोण ? असेही ह.भ.प. राऊतदादा महाराज यांनी सांगितले. याप्रसंगी माजी आ.भीमराव धोंडे यांचे बंधू चेअरमन राजेंद्र धोंडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस उद्योगपती बापूसाहेब डोके, सामाजिक कार्यकर्ते बाबुशेठ भंडारी,साईनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष व सरपंच सावता ससाणे, ह.भ.प.आजबे महाराज,भाजपा किसान सभेचे तालुकाध्यक्ष बबनराव औटे, ह.भ.प.कारभारी धस महाराज, जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,पत्रकार अमोल जगताप, माजी सभापती अशोक ढवण, मल्हार सेनेचे युवराज खटके, ह.भ.प. संतोष मोरे महाराज,ह.भ.प.पांडुरंग कर्डीले महाराज, ह.भ.प.दादा महाराज चांगुणे,माजी उपसरपंच बाळासाहेब कर्डीले, उपप्राचार्य डॉ.संभाजी वाघुले, प्रा.दादा विधाते यांची श्रध्दांजलीपर भाषणे झाली.यावेळी शेतकरी शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक विठ्ठलराव बन्सोडे, प्राचार्य डॉ. हरिदास विधाते,मदन महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,माजी जि.प. सदस्य रविंद्र पाटील, सुनिल मेहेत्रे,इंजि.पी.बी. बोडखे,तहसीलदार विजय बोरुडे, रमेश गदादे (मिरजगांव),विकास गाडे,रासपचे नेते डॉ.शिवाजी शेंडगे,रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे,सुदाम ढोबळे,सरपंच भीमराव पाटील,शेतकरी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी संजय शेंडे, सुभाष वाघ सर,आसाराम कर्डिले,कृषी विभागाचे संदीप चाकणे, कांतीलाल ढोबळे,पत्रकार नितीन कांबळे,संजय खंडागळे,एकशिंगे, उपप्राचार्य डॉ.भास्कर चव्हाण,माजी सरपंच सदाशिव कन्हेरकर,बाबा वाघुले, प्रा.अशोक माळशिखरे,संपत कोथमिरे, प्रा.राजेंद्र डांगे,सरपंच दादासाहेब जगताप,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुरेश मिरगणे,उपप्राचार्य डॉ.बापु खैरे,उपप्राचार्य संजय धोंडे, ह.भ.प. तुळशीराम आडसरे महाराज, राम ससाणे सर, मुख्याध्यापक सुनिल तरटे,चेअरमन डॉ.शाम सांगळे,प्रा. अविनाश भवर,डॉ.आर.जी.विधाते,डॉ. जी.पी.बोडखे,मोहन अनारसे,प्रा. दत्तात्रय ढवळे,मुख्याध्यापक रविंद्र भुकन,मल्हारी पाचपुते,ग्रामविकास अधिकारी भागवत अनारसे,हरिचंद्र बोडखे सर,बाबासाहेब भुकन, संजय भोजने,बी.जी.ससाणे यांच्यासह राजकीय,शैक्षणिक, सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आणि दिगंबर बोडखे यांचा मित्रपरिवार आणि नातेवाईक उपस्थित होते.उपस्थितांचे पत्रकार उत्तम बोडखे यांनी आभार मानले.
stay connected