मतदार संघातील गुंडगिरीचा नायनाट करणार- माजी आमदार Bhimrao Dhonde

 फॉर्म भरला आता तो काढायचा नाही सर्वसामान्यांची एकच मागणी




मतदार संघातील गुंडगिरीचा नायनाट करणार- माजी आमदार भीमरावजी धोंडे


आष्टी प्रतिनिधी - साहेब तुम्ही निवडणुकीचा फॉर्म भरला परंतु कोणाचाही दबाव आला तरी तो काढायचा नाही अशी एक मुखी मागणी मतदार संघातील सर्वसामान्य जनतेतून होत आहे. तर मागील अनेक वर्षापासून आष्टी मतदार संघात सुरू असलेली गुंडगिरी व दहशतवाद माजवून सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याचे काम गुंडामार्फत होत आहे. त्याचा नायनाट करण्यासाठी आपण निवडणूक लढ्वत असून कोणाच्याही दबावाला बळी न पडता निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार भीमरावजी धोंडे यांनी धानोरा येथे केले. ते लोणी जिल्हा परिषद गट, दौलावडगाव जिल्हा परिषद गट व धानोरा गणातील प्रमुख कार्यकर्ते व बुथ कमिटी सदस्यांची बैठक धानोरा येथे आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना माजी आमदार भीमरावजी धोंडे म्हणाले की, मी वीस वर्ष आमदार राहिलो आहे. माझ्या कार्यकाळामध्ये कोणालाही अडचणी येऊ दिल्या नाही. मी नेहमीच सर्वसामान्य जनतेला प्रथम प्राधान्य दिले आहे. माझ्या कार्यकाळात कोणालाही त्रास झालेला नाही, कोनाकडून कधीही टक्केवारीची मागणी केलेली नाही, चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामासाठी कोणत्याही शासकीय कार्यालयात गेलो नाही, परंतु मागील काही काळात सर्वसामान्यांना गुंडामार्फत सर्व सामान्य जनतेला त्रास दिला जात आहे तो कदापिही सहन करणार नाही.  मतदार संघातील जनतेने घाबरून जाऊ नये, मतदार संघातील दहशत व गुंडगिरीचा समूळ नायनाट करणार आहे. मला अनेक कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत की, मी दबावापोटी निवडणुकीतून माघार घेणार आहे. परंतु मी निवडणुकीतून माघार घेणार नाही. माझ्या शिक्षण संस्थेमध्ये अठरापगड जातीतील लोकांसोबतच प्रत्येक समाजाचा व्यक्ती संस्थेत काम करत आहे. आज मतदारसंघातील जनतेला पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, जलजीवनचे जे कामे राबवले आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाले आहेत त्याची चौकशी व्हायला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मी सर्वात अगोदर पाठिंबा दिलेला आहे असेही भीमराव धोंडे यांनी सांगितले.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती विजयकुमार बांदल हे होते.



यावेळी व्यासपीठावर युवा नेते अजयदादा धोंडे, माजी सभापती साहेबराव म्हस्के, मुकादम मुरलीधर लगड,अभयराजे धोंडे,राजाराम ननावरे,पांडुरंग गावडे,

नरहरी तागड,बाबासाहेब जाधव,

रंगनाथ बोडखे, माजी सरपंच संजय कवडे, संजय धायगुडे, झुंबर चव्हाण, सय्यद

फारुकभाई, तुकाराम चव्हाण, बाळासाहेब शेकडे,बबन ननावरे,धुळाजी लकडे आदी उपस्थित होते.

यावेळी पांडुरंग गावडे,  युवराज खटके, कैलास वायभासे,  सरपंच संजय‌ विधाते, माजी उपसरपंच भगवान काळे, अरुण क्षेत्रे, योगेश विधाते, माजी पं. स. सदस्य संजय धायगुडे, सरपंच भरत जाधव, भरत काळे,  कुमार तागड, राधाकीसन सिरसाट, अमोल खटके, माजी सरपंच संजय नालकोल, महादेव पांढरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास सरपंच तात्यासाहेब नालकोल सरपंच सावता ससाणे, जि. प. सदस्य सुरेश माळी,उपसभापती नामदेव धोंडे, नानाभाऊ वाडेकर, सरपंच सोमीनाध गायकवाड, दिगंबर मेहेत्रे, म्हातारदेव शेकडे, चेअरमन पांडुरंग धोंडे, माजी सरपंच संजय नालकोल, भाऊसाहेब देसाई, बाबासाहेब एकशिंगे, भिकाजी दातीर, अशोक अडागळे, सरपंच संजय विधाते, देविदास परकाळे, लक्ष्मण झगडे,अशोक गवळी, नवनाथ शेळके, सावन तागड,  सरपंच ठोंबरे, बाबासाहेब जाधव, बबन गाडे, बजरंग देसाई, युनूस शेख,

अनिस सय्यद, बाबासाहेब तागड, , राधाकिसन शिरसाट, महेश शेळके, नईम शेख, ज्ञानेश्वर मगर, हरिभाऊ जंजिरे, अशोक काळे, काकासाहेब झांजे, नंदकुमार फसले, सरपंच भरत जाधव, परमेश्वर कर्डीले, गणेश पवार, दादासाहेब इथापे, बाबासाहेब एकशिंगे,लक्ष्मण शेळके,माजी सरपंच चंद्रशेखर साके, मच्छिंद्र शेळके, पांडुरंग सायंबर,कृष्णा सायंबर, याकुब शेख, सुभाष काळे, सरपंच ज्ञानेश्वर वाघ, सुरेश शेकडे, बापुराव पठारे, नवनाथ राठोड, रामकिशन ठोंबरे,  अमोल खटके,  मुकेश घाटविसावे, संतोष शेळके, संभाजी पांडूळे, सचिन सुंबे, दादा ठोंबरे, भरत चव्हाण, नवनाथ शेळके व इतरांची उपस्थिती होती.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.