पोळ्याच्या निमित्ताने मा. आ. भीमराव धोंडे
यांच्या निवासस्थानी बैलांची पूजा
आष्टी प्रतिनिधी
शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा सण म्हणजे बैलपोळा, बैलपोळ्याच्या निमित्ताने माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या निवासस्थानी झुली टाकुन, रंग लावुन सजविलेल्या शेतातील बैलाची सौभाग्यवती सौ.दमयंतीताई धोंडे व मा आ भिमराव धोंडे यांच्या हस्ते पुजा करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की भारत हा कृषिप्रधान देश समजला जातो देशाची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांवर व कृषीवर अवलंबून आहे त्यामुळे देशातील शेतकऱ्याला अनन्य साधारण महत्व आहे. देशातील शेतात राबण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा म्हणजे बैल होय. गेल्या आठ दहा वर्षांपासून शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असला तरी आजही अनेक शेतकऱ्यांकडे शेतीची मशागत करण्यासाठी बैल जोडी आहेत. ते बैलाच्या साह्याने शेती करतात. बैलाचा सण म्हणून महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपापल्याला बैलाला साबन लावून आंघोळ घालतात, तसेच वेगवेगळे रंग देऊन त्याची चांगली सजावट करीत, शिंगाला हिंगुळ लावून सजवले जाते तसेच अंगावर झुली टाकून त्याची गावातून मिरवणूक काढली जाते. ग्रामीण भागातील नोकरदार व नेते मंडळी हे शेतकरी पुत्रच असल्याने प्रत्येक जण पोळा सण उत्साहात साजरा करतात. आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे माजी आमदार भिमराव धोंडे हे शेतकरी कुटुंबात जन्मले आहेत त्यांना शेतीची प्रथम पासून आवड आहे त्यामुळे ते प्रत्येक वर्षी बैल पोळा हा सण उत्साहात साजरा करतात. बैलाची मिरवणूक काढून आष्टी येथे आपल्या निवासस्थानी बैलाची पूजा केली जाते.
stay connected