स्वराज्य शक्ती सेना या पक्षाच्या आष्टी तालुकाध्यक्ष पदी सय्यद मुबीन यांची निवड
आष्टी ( प्रतिनिधी )
सौ. करुणा धनंजय मुंडे यांच्या प्रखर राष्ट्रभक्तीच्या विचारधारेने शिक्षीत होऊन, भारत देशात नव्याने स्वराज्य घडवण्याचा संकल्प पुर्ण करण्यासाठी स्वराज्य शक्ती सेना या पक्षाच्या आष्टी तालुकाध्यक्ष पदी सय्यद मुबीन यांची निवड करण्यात आली आहे
नियुक्ती पत्रात म्हटले आहे की स्वराज्य शक्ती सेना या पक्षाची घटना व नियम यांचे तंतोतंत पालन करावे. तसेच स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ . करुणा धनंजय मुंडे यांच्या सर्व आदेशाची अंमलबजावणी करावी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण स्वराज्य शक्ती सेनेचे कार्य संपूर्ण भारत देशात न्यावे.
समाजातील दिनदलीत, गरीब, मागासवर्गीय, आदिवासी व सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य आपण करावे, भ्रष्ट प्रशासनाच्या विरुध्द आपण लोकशाही मार्गाने लढा द्यावा. आपण परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या भारत देशाच्या संविधानाचं व संविधानातील प्रास्ताविकेतील दिलेल्या शपथेचे पालन करावे. आपण जात पात धर्म भेद मानू नयेः धर्मनिरपेक्ष राजनिती करावी.
आपण बीड जिल्हयामध्ये स्वराज्य शक्ती सेना या पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान राबवावे व जिल्हयात -ठिकाणी पक्ष वाढवण्यासाठी कार्य सुरु करावे. असे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे .
सय्यद मुबीन यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनदन शेख सोहेल , पठाण सलमान , शेख जाफर ,शेख इसाक ,शेख अकील ,शेख मिराज ,शेख इसाक ,महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक अमर शेख , शेख महेबुब महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटना जिल्हा सरचिटनीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .
stay connected