अॅड. नरसिंह जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे खा. बजरंग सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन
आष्टी प्रतिनिधी -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रमुख व आष्टी विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवार अॅड. नरसिंह जाधव यांच्या आष्टी येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात येणार असून, या कार्यक्रमास आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील नागरिकानी उपस्थित रहावे असे आवाहन अॅड. नरसिंह जाधव यांनी केले आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, माजी आमदार राजेंद्र जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र काळे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ, डॉ. विलास सोनवणे, प्रदेश सरचिटणीस प्रा. सुशिलाताई मोराळे, प्रदेश सरचिटणीस बापूसाहेब डोके, माजी पंचायत समिती सदस्य गुलाबराव घुमरे, किशोर हंबर्डे, अमोल तरटे, कॉ. महादेव नागरगोजे, शेकाप जिल्हा सरचिटणीस विष्णुपंत घोलप, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अॅड. सय्यद वहाब, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष डॉ. नदीम शेख, जिल्हा सरचिटणीस गणीभाई, अतुल शिंदे, शिवाजी पारखे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव साके, दादासाहेब झांजे, गंगा आजबे, जिल्हाध्यक्ष लीगल सेल सतीश गाडे, मुखराम पठाण, अॅड. ज्ञानेश्वर नाईकनवरे आदीसह महविकास आघाडीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थीत राहणार असून या कार्यक्रमास आष्टी मतदार संघातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अॅड नरसिंह जाधव यांनी केले आहे.
stay connected